माणसं अधिकारी झाले की माणूसकी विसरतात- प्रा. मधुकर राळेभात

0
188

 

जामखेड न्यूज—–

माणसं अधिकारी झाले की माणूसकी विसरतात- प्रा. मधुकर (आबा) राळेभात

जामखेड (प्रतिनिधी) नगरपरिषद महिला सफाई कर्मचाऱ्यांना ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक व कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी साडी व फराळ देऊन एक अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली.


सतत भावा समान या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा उभा करणार आहे या माझ्या बहिणी सकाळी पहाटे 5:00 वाजता उठून संपूर्ण गाव स्वच्छ करतात आणि नंतर स्वतःचे घर स्वच्छ करतात, याचं कर्मचाऱ्यांना एन दिवाळीच्या सणासुदीत सुद्धा त्यांच्या कामाचा दाम पगार दिला जात नाही. 

ही बाब विचार करण्यासारखे आहे.
दिवाळी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो या सणांमध्ये प्रत्येक घरामध्ये नवीन कपडे फराळ केला जातो, परंतु माझ्या या कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये दिवाळीचा दिवाचं पेटणार नाही असे जेव्हा मला समजले तेव्हा मी तात्काळ नगर परिषदेला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निवेदन देऊन मागणी केली तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्याच्या थकीत पगारांपैकी एक महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आला, अशी या कर्मचाऱ्यांची परिस्थिती पाहून 100 महिलांना भाऊबीजेच्या निमित्ताने साडी व फराळ भेट देण्यात आली. 


ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचलित निवारा बालगृहाच्या वतीने समता भूमी मोहा फाटा येथे आयोजित नगरपरिषद सफाई महिला कर्मचारी यांना दिवाळी भाऊबीजेच्या निमित्त साडी व फराळ वाटपाचा कार्यक्रम नव चेतना सर्वांगीण विकास केंद्र केज संस्थेच्या संस्थापिका मा.सौ. मनिषा ताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते, प्रा. मधुकर (आबा) राळेभात, ज्योती क्रांती उद्योग समूहाचे चेअरमन मा.आजिनाथ हजारे, उद्योजक मा. अझर काझी, काँग्रेस नेते मा. सुनील शिंदे सामाजिक कार्यकर्ते मा.सय्यद मुक्तार उद्योजक मा. दादा पाटील दाताळ, मास्तर मुकुंद घायतडक,विशाल पवार,आजीनाथ शिंदे आदी यावेळी विचार पिठावर उपस्थित होते. 


यावेळी बोलताना प्रा.मधुकर (आबा) राळेभात म्हणाले की समता भूमीमध्ये एक समानता, बंधुता, प्रेम ही भावना पेरली जाते या दिवाळीच्या भाऊबीजेचा कार्यक्रम तुमचा छोटा भाऊ अरुण यांनी ठेवला आहे साडी किती किमतीची आहे त्यापेक्षा भावाने भेट दिली आहे. ही खूप महत्त्वाची असते भाऊ म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू कारण तुम्ही हे गाव स्वच्छतेचे काम करतात तुम्ही कधीच तुमच्या आरोग्याचा विचार करत नाही आणि आजारीपणामध्ये तुमच्याकडे पैसे नसतात म्हणून तुमच्या या सर्व मागण्यासाठी नगर परिषदेकडे दाद मागून तुमच्या आरोग्यासाठी वेगळा फंड ठेवण्याची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत कारण ही व्यवस्था बदलली पाहिजे नाहीतर पुढील काळात खूप वाईट गोष्टी घडतील अरुण भाऊंनी हा अत्यंत गोड कार्यक्रम घेतला तुमचे असेच प्रेम वाढत जाईल या बालगृहा मार्फत सतत चांगले कार्य केले जात आहे.

ज्योती क्रांती उद्योग समूहाचे चेअरमन आजिनाथ हजारे म्हणाले की गरीबीची चटके ज्यांनी सोसले आहेत त्यांनाच या दिन दुबळ्याची काळजी असते अरुण भाऊ यांच्या मनाचा खूप मोठेपणा आहे कारण या स्वच्छता दूत महिलांची भाऊबीज या बालगृहावर ती साजरी होत आहे आणि बहिणींना केल्याने भावाला कधी कमी पडत नाही खूप आत्मिक सुख वाटते या समाजात पैशाने माणसं भेटत नाही, आणि जे पैशाने माणसं भेटतात ते दलाल असतात म्हणून या साडी पेक्षा हा अरुण भाऊ तुमच्या कायमस्वरूपी पाठीशी भाऊ म्हणून उभा राहील,

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. मनिषा ताई घुले म्हणाल्या की या संस्थेचे आणि माझे नाते अगदी बहीण भावाप्रमाणे जवळच आहे ही संस्था अनेक दिवसापासून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे मी सतत पाहत आहे अरुण भाऊ तुमच्या कष्टाच्या दामासाठी नगरपरिषदेच्या खुर्चीला भांडत असतात त्यामुळे यापुढे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर असणार आहोत कारण आपण काम करत आहोत आपल्या कष्टाचे पैसे मागत आहोत, भीक मागत नाहीत. यासाठी आपल्या संघटनेची एकजूट महत्वाची आहे कारण या व्यवस्थेला तुमच्या गरीबाची, पगाराची, कुटुंबाची, आरोग्याची, शिक्षणाची काही गरज नाही त्यामुळेच आपली लढाई ही इथल्या व्यवस्थेबरोबर आहे कारण आमच्या कामगारांना छळणाराची सफाई करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही,

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व संस्थेच्या वतीने मान्यवरांचे गुलाबपुष्प आणि आम्ही घडलो हे या संस्थेचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला‌

संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी प्रास्ताविक व स्वागत केले,प्रा. संतोष चव्हाण सर यांनी सूत्रसंचालन केले व प्रा.वैजीनाथ केसकर सर यांनी आभार मानले,

या कार्यक्रमात निर्मला जाधव, कौशल्या थोरात, नंदकुमार गाडे सर गणपत कराळे तरडगावच्या सरपंच सौ संगीता केसकर तुकाराम शिंदे, संतोष चव्हाण ऋषिकेश गायकवाड सखाराम केसकर बाळासाहेब काळे,कुंडल वारभवण, विशाल समुद्र, सतिश क्षिरसागर,शहाजी केवळ, अभिजित समुद्र,सुरेखा चव्हाण, मोहिते मॅडम,पायल मुळेकर,छाया मोरे,गौतमी गंगावणे, आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here