जामखेड न्युज——
जामखेडमध्ये भगवान नावाच्या टोळीची दहशत -रमेश आजबे
जामखेड शहरात अनेक दिवसांपासून भगवान नावाच्या टोळीची प्रचंड दहशत आहे. यामुळे जामखेडच्या बाजारपेठेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांना त्रास होवूनही इज्जतीसाठी कोणी तक्रार देत नाहीत. मीही या टोळीची शिकार झालो आहे. आम्ही सर्व अंदुरे कुटुंबाबरोबर आहोत. असे रमेश आजबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर व त्यांच्या काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साथीदारांनी प्रसिद्ध व्यापारी अंदुरे कुटुंबीयाला खंडणीसाठी मारहाण केली. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड दहशत आहे. अंदुरे कुंटुबातील कोणावरही आगोदर साधा गुन्हा दाखल नाही. त्यामुळे जामखेडची बाजारपेठ वाचवण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी अंदुरे बरोबर आहोत असे आजबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना रमेश आजबे यांनी सांगितले की, आतापर्यंत भगवान टोळीने दहा ते पंधरा व्यापाऱ्यांना ब्लँक मेल केलेले आहे. यामुळे व्यापारी कुटुंबामध्ये प्रचंड दहशत आहे. मीही या टोळीचा शिकार झालो आहे. व्यापारी वर्गातील दहशत नाहिसी करण्यासाठी सर्व व्यापारी वर्गाने अंदुरे कुटुंबाला साथ द्यावी असे आवाहन व्यापारी वर्गाला केली आहे.
अंदुरे कुटुंबीयाला मारहाण करूनही आरोपी मोकाट आहेत. पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक करावी
अशा प्रकाराला जर वेळीच आळा घालता नाही तर प्रसिद्ध असणारी जामखेडची बाजारपेठ लयाला जाईल असेही आजबे यांनी सांगितले.
अंदुरेसारखा प्रकार माझ्या बरोबर घडला आहे
मलाही त्रास दिला आहे. मी पैसे देऊन प्रकरण मिटवले होते परत आठ दिवसात परत जास्त पैशाची मागणी भगवान गँगने केली आठ दिवसात परत माझ्या दुकानाच्या चाव्या घेतल्या जास्त पैशाची मागणी होऊ लागली आहे.
या आगोदर अनेकांकडून खंडणी वसूल केलेली आहे लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. भगवान नावाची टोळी आहे आतापर्यंत दहा ते पंधरा लोकांची शिकार झाले आहेत. तसेच मी पण शिकार झालो आहे.
व्यापाऱ्यांना बदनाम करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे आम्ही सर्व व्यापारी अंदुरे बरोबर आहेत. भगवान बरोबर असणारे लोक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.
अंदुरेसारखा प्रकार माझ्या बरोबर घडला आहे
मलाही त्रास दिला आहे. मी पैसे देऊन प्रकरण मिटवले होते परत आठ दिवसात परत जास्त पैशाची मागणी भगवान गँगने केली आठ दिवसात परत माझ्या दुकानाच्या चाव्या घेतल्या जास्त पैशाची मागणी होऊ लागली आहे.