किल्ले खर्डा शिवपट्टण येथे श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव उत्साहात साजरा खर्डाच्या मराठ्यांचे विजयी लढाईस २२७ वर्षे पूर्ण. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने २२७ मशाली प्रज्वलित करून दिली मानवंदना.

0
185

जामखेड न्युज——

किल्ले खर्डा शिवपट्टण येथे श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव उत्साहात साजरा

खर्डाच्या मराठ्यांचे विजयी लढाईस २२७ वर्षे पूर्ण.

श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने २२७ मशाली प्रज्वलित करून दिली मानवंदना.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड तालुक्याच्या वतीने खर्डा किल्ले शिवपट्टण येथे मराठ्यांच्या विजयास 227 वर्षे पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक शौर्याला 227 मशाली प्रज्वलित करून दीपावली पाडव्या निमित्त मानवंदना देऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.
संपूर्ण खर्डा किल्ला व स्वराज्य ध्वजा जवळ सर्व मावळ्यांनी मशालीच्या पेटवल्या या प्रकाशाने किल्ला परिसर उजळून निघाला. व फटाकडे व तोफा यांचे अतिषबाजी केली यावेळी जामखेड,खर्डा, भूम येथील शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांनी व छत्रपती शिवरायांच्या गीतांनी खर्डा किल्ला दुमदुमून निघाला. मावळ्यांनी संपूर्ण किल्ल्याला मशाल प्रदक्षिणा घातली.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले यांनी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत आहोत.

देव देश आणि धर्म व राष्ट्रहितासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हे कार्य करत आहे.
किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांची पूजा अविरत पणे श्रीशिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे यामध्ये जामखेड तालुका मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहे.

खर्डा इतिहास मराठ्यांच्या विजयाची साक्ष देणारा आहे. खर्डा किल्ल्यांचे बांधकाम उत्कृष्ट झाले पाहिजे यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन लवकरच होणार आहे तरी सर्वांनी तन-मन-धनाने कार्य करावे सर्वांनी तत्पर राहावे.

खर्डा नाहीतर शिवपट्टण असा उल्लेख सर्वांनी करावा. रनटेकडी शौर्य स्थळाचे जतन झाले पाहिजे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज व छ संभाजी महाराज यांच्या विचारा शिवाय देशाला पर्याय नाही त्याचां आचार विचार सर्वांनी अंगीकृत केला पाहिजे.

असे मनोगत व्यक्त केले.शेवटी शिवरायांच्या आठवावे रूप सामुहिक घेउन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here