जामखेड न्युज——
केज तालुक्यात दहा दिवसांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकच खळबळ!!
१५ आँक्टोबर रोजी केज तालुक्यातील राजेगाव येथील संजय दौंड या शेतकऱ्यांने सोयाबीन पाण्यात गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती परत काल केज तालुक्यातील जोला गणेश सारूक या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेतात लावलेलं सोयाबीन परतीच्या पावसाने मातीमोल झालं, तब्बल 2 एक्कर मध्ये सोयाबीनच्या लागवडीसाठी केलेली मशागत बियाणांचे पैसे आणि ऐन दिवाळीत जेव्हा सोयाबीन विकून घेतलेली कर्ज फेडायची वेळ आली त्याच वेळी परतीच्या पावसाने घात केला आणि सर्व सोयाबीनचा अक्षरश: डोळ्यासमोर चिखलात गेलं.
त्यामुळे आता घेतलेलं कर्ज कसं भागवायचं ? या विवंचनेतून एका 31 वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील जोला या गावात घडली आहे.
तर आमचं 2 एकर सोयाबीन गेलं म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचललं म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने एकच टाहो फोडला, त्यामुळे ऐन तरण्याबांड शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला असून संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गणेश मारोती सारूक वय 31 रा. जोला ता. केज असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश सारूक यांची 2 एक्कर सोयाबीन पेरली होती.
मात्र अतिवृष्टीने पुरतं सोयाबीन वाया गेलं. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीसह इतर खाजगी घेतलेलं कर्ज कसं फेडाव ? या नैराश्यातून कर्जबाजारीपणाला कंटाळून गणेश सारूक यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.