प्रेरणादायी बातमी आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, झाली आयपीएस

0
402

जामखेड न्युज——

प्रेरणादायी बातमी

आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, झाली आयपीएस

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवसरात्र मेहनत करत असतात, पण त्यात किती जण यशस्वी होतात हे तुम्हाला माहीत असेलच. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आईने मजुरी करून शिकवलं आणि लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं आहे. लेक IPS झाली आहे.

हरियाणातील महेंद्रगड येथील दिव्या तनवर तिच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी असून ती तिची आई आणि दोन लहान भावंडांसोबत राहते. ती अत्यंत साध्या कुटुंबातून आली असून UPSC परीक्षेत तिचा हा पहिलाच प्रयत्न होता.

पहिल्याच प्रयत्नात दिव्या IPS झाली आहे. दिव्या खूप लहान होती जेव्हा तिचे वडील गेले, त्यानंतर तिच्या आईने इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम केले आणि मुलांना शिकवलं.

दिव्याने तिचे प्राथमिक शिक्षण निंबी जिल्ह्यातील मनू स्कूलमधून केले आणि नंतर ती परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात दाखल झाली. तिने सरकारी पीजी कॉलेजमधून बीएस्सी पदवी पूर्ण केली आहे. दिव्या मुलांनाही शिकवायची. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नशिबापेक्षा मेहनत महत्त्वाची असते, असं ती मानते. जर एखाद्याने ठरवले असेल की त्याला ते करायचे आहे, तर तो कठोर परिश्रमाच्या जोरावर ते साध्य करू शकतो.

दररोज 10 तास अभ्यास

दिव्याचे घर खूप छोटे आहे पण तिने तिथे राहून तयारी केली. परीक्षेसाठी तिने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही आणि स्वत: केलेल्या अभ्यासाच्या मदतीने आपले ध्येय साध्य केले. ती दिवसातून 10 तास अभ्यास करायची आणि कधीही घराबाहेर पडली नाही.

खाणे, अभ्यास आणि झोप, एवढेच तिच्या तयारीचे वेळापत्रक होते. दिव्या तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला देते जिने नेहमी तिच्या मुलीचा हात धरला आणि तिच्या वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here