कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला तलाठी संघटनेच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयांची मदत

0
179
प्रतिनिधी जामखेड 
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विशाल नाईकवाडे  यांनी केलेल्या आवाहनस प्रतिसाद देत, जामखेड तलाठी संघटनेच्या वतीने डॉ. आरोळे कोविड सेंटरला ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. हा मदतीचा धनादेश प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांचे हस्ते कोवीड सेंटरचे संचालक डॉ. रवी दादा आरोळे यांचेकडे सपुर्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुखदेव कारंडे, सचिव विकास मोराळे, मंडळ अधिकारी लटके व तलाठी शिवाजी हजारे उपस्थित होते.
  तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा वेळी डॉ. आरोळे हॉस्पिटल मधील उभारण्यात आलेले कोवीड सेंटर रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. डॉ. रवी आरोळे, डॉ. शोभा आरोळे व त्यांचे कर्मचारी रांञदिवस रूग्णांची सेवा करत आहेत. अश्या परिस्थितीत मदत कमी पडत आहे. ही बाब डॉ. रवी आरोळे यांनी २  दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणून दिली होती.
 सध्या २५० च्या वर रूग्ण उपचार घेत असून, साठ रूग्ण आॅक्सिजन वर आहेत. या सर्वांना सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या मदतीची गरज भासणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे. जामखेडकरांनी यापुर्वीही मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. तशीच मदत यापुढे करावी असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत आज ही मदत कोवीड सेंटर प्रशासनाकडे सपुर्त करण्यात आली.
  कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणारे आरोळे कोविड सेंटर हे राज्यातील एकमेव कोविड सेंटर आहे. त्यामुळे दररोजचा खर्च खुप असतो. एवढा खर्च हाॅस्पिटल प्रशासन करू शकत नाही त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक मदत करत आहेत. अनेक नेते मंडळी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला मदत करत आहेत.
  आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, विठ्ठल (आण्णा) राऊत, तलाठी संघटना, संजय कोठारी मित्रपरिवारांतर्फे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांच्या सह अनेक मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here