जामखेड न्युज——
राहुल उगले यांच्यावर काँग्रेस पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी, प्रदेश युवक सचिव पदी नियुक्ती
युवक काँग्रेसचे कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे व जामखेड तालुका युवक काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ राहुल (दादा) उगले यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी नियुक्ती झाली. या बद्दल त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
युवकांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राहुल उगले हे गेल्या दहा वर्षांपासुन राजकारणात सक्रिय आहेत. या पुर्वी देखील त्यांनी अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष, जामखेड तालुका हमाल पंचायत चे अध्यक्ष, जामखेड तालुका दुध संघाचे माजी संचालक, मिनाताई ठाकरे जीनिंग प्रेसिंग सहकारी संस्था जामखेडचे व्हाईस चेअरमन, जय भवानी दुध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नायगाव चे चेअरमन, जामखेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे तज्ञ संचालक अशी पदे भुषविली आहेत.
या वेळी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवकांच्या संघटनेचे जाळे पसरवणार आहे. युकक कॉंग्रेस च्या संकल्पने नुसार माझं गाव माझी शाखा या नुसार प्रत्येक बुथ पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
आमदार बाबासाहेब थोरात व युवकांचे नेते सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व सहकारी निवडणूकांनमध्ये कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंबई व दिल्ली या ठीकाणी महागाई व बेरोजगारी विरोधात युवकांना घेऊन आंदोलने केली तसचे तीन काळे कायद्या विरोधात ३५ हजार सह्यांची मोहीम देखिल राबवली होती.
माजी मंत्री कै.आबासाहेब निंबालकर , कै.साहेबराव पवार यांच्या नंतर खुप वर्षानी जामखेड तालुक्या मधुन कॉंग्रेस पक्षा मध्ये राज्य स्तरावर राहुल उगले याना काम करण्यांची संधी मिळाली आहे.ते नक्किच या संधिच सोन करतील असा विश्वास जामखेड मधिल पदाधिकारी,कार्यकर्ते आणि जामखेड मधिल सामान्य नागरिकाना आहे.
निवड़ झाल्याबद्दल त्यांचे कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे,आ. लहू कानडे, प्रभारी मितेंद्र सिंह, सहप्रभारी वंदना बैन, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राउत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, अनिकेत म्हात्रे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बालासाहेब सालुंके, सचिन गुजर,ज्ञानदेव वाफ़ारे, जामखेड कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, शहराध्यक्ष देवीदास भादलकर, ज्योतिताई गोलेकर, शिवराज घुमरे, विशाल डूचे,गौतम पवार, अपलसंख्याक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष फिरोज पठान,शहराध्यक्ष जावेद शेख़, विक्रांत अब्दुले,अनिकेत जाधव, आदेश सरोदे, किरण कोल्हे, प्रीतम ढगे, कुंडल राळेभात, अवधुत पवार, तसेच कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.