Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या साकत सेवा संस्था व्यावसायिक गाळे बांधणार – चेअरमन कैलास वराट हरीभाऊ...

साकत सेवा संस्था व्यावसायिक गाळे बांधणार – चेअरमन कैलास वराट हरीभाऊ मुरूमकर व शहादेव वराट यांची साकत सेवा संस्थेच्या स्विकृत संचालक पदी निवड

0
252

जामखेड न्युज——

साकत सेवा संस्था व्यावसायिक गाळे बांधणार – चेअरमन कैलास वराट!!! 

हरीभाऊ मुरूमकर व शहादेव वराट यांची साकत सेवा संस्थेच्या स्विकृत संचालक पदी निवड!!! 

साकत सेवा संस्था भविष्यात लवकरच मोठी इमारत व व्यावसायिक गाळे तसेच मिंटीग व्हाँल बाधणार असा ठराव मासिक मिटींग मध्ये चेअरमन कैलास वराट यांनी मांडला याला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला यावेळी स्विकृत संचालक म्हणून शहादेव वराट व हरीभाऊ मुरूमकर यांची निवड करण्यात आली.

चेअरमन कैलास वराट यांच्या अध्यक्षतेखाली आज साकत सेवा संस्थेची मिंटीग संपन्न झाली यात शहादेव वराट व हरीभाऊ मुरूमकर यांची बहुमताने स्विकृत संचालक पदी निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वराट, भाजपाचे नेते प्रा. अरूण वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, व्हाइस चेअरमन दादा नेमाने, संचालक पोपट वराट, सौ. जयश्री वराट,नाना लहाने, महादेव वराट, भाऊसाहेब पुलवळे, पांडुरंग सानप, युवराज वराट, रामहरी वराट, अजित वराट, कृष्णा पुलवळे, भाऊसाहेब मुरूमकर सचिव दादा मेंढकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना चेअरमन कैलास वराट म्हणाले की, भविष्यात सेवा संस्थेची भव्य दिव्य इमारत तसेच तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून व्यावसायिक गाळे तसेच मिटींग व्हाँल बांधण्यात येणार आहे. हे लवकरात लवकर होईल यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल असेही सांगितले.

यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, सेवा संस्थेचे शेतकरी हिताचे निर्णय घेऊन काटकसरीने कारभार करावा असे सर्व संचालकांना आवाहन केले.
यावेळी नवनियुक्त संचालक हरीभाऊ मुरूमकर म्हणाले की, सेवा संस्थेने आमच्या वर विश्वास दाखवून आम्हाला स्विकृत संचालक पदी काम करणाची संधी दिली आम्ही सभासद शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असेही सांगितले.

नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन प्राचार्य युवराज मुरूमकर, बाळासाहेब सानप, डॉ. सुनिल वराट, भरत लहाने, प्रदिप लहाने, वसंत वराट, विष्णू लहाने, राम जावळे, विठ्ठल वराट, अविन लहाने, महादेव वराट, अशोक नेमाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!