Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन महाराजांचा जामखेड भक्ती शक्ती महोत्सव...

सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन महाराजांचा जामखेड भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने होणार सन्मान सोहळा

0
197

जामखेड न्युज——

सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन महाराजांचा जामखेड भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने होणार सन्मान सोहळा!! 

उत्तम महाराज वराट यांचे किर्तन

निरपेक्ष भावनेने महाराष्ट्रात हजारो महाराजांना घडविणाऱ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन महाराजांचा भक्ती शक्ती महोत्सव समिती व जामखेड शहरवासीय यांच्या वतीने आजी-माजी साधकांचा साधक पूजन सोहळा बुधवारी  आयोजित करण्यात आला आहे. हभप उत्तम महाराज वराट यांचे किर्तन होणार आहे तरी सर्व भाविक भक्त व संस्थेतील साधकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भक्ती शक्ती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 
स्वानंद सुकनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेला जवळजवळ 106 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत या संस्थेने महाराष्ट्राला अनेक कीर्तनकार गुरुजन गायक वादक वारकरी विचारधारा जिवंत ठेवणारे प्रचारक तत्त्ववेत्ते दिले आहेत या संस्थेचा इतिहास असा आहे विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही अशी अव्यहातपणे 106 वर्ष ही संस्था काम करत आहेत. 
या संस्थेने समाज घडवण्यासाठी अनेक हिरे जन्माला घातले समाजाच्या हितासाठी दिले कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने अनेक विभूती होऊन गेल्या त्यांनी खूप मोठे समाज प्रबोधनाचा कार्य केलं व संत पदाला पोहोचले त्याचं कारण  सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था याच संस्थेत आपल्या तालुक्यातील श्री ह भ प कैलास महाराज भोरे श्री उत्तम महाराज वराट श्री भागवत महाराज दळवी ही मंडळी तयार होऊन समाजप्रबोधनाचा काम निरपेक्ष भावनेने करत आहेत. 
 आजही संस्थेमध्ये आपल्या तालुक्यातील खूप मंडळी नाहीत परंतु जे आहेत त्यांचा सन्मान व्हावं त्यांचं पूजन व्हावं ही मानसिकता आहे म्हणून 26 10 2022 रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये विठ्ठल भजनी मंडळ भक्ती शक्ती महोत्सव समिती व जामखेड शहरवासी यांच्या वतीने आजी-माजी साधकांचा साधक पूजन सोहळा
विठ्ठल मंदिर मेन रोड जामखेड येथे करण्याचे ठरवले आहे या कार्यक्रमासाठी तालुक्यातून जे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून सुटलेले साधक व सध्या संस्थेत असलेले साधक या सर्व गुनिजन व साधक मायबाप साधू संतांचा सन्मान पूजन सोहळा सात ते नऊ या वेळेमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे साधक पूजन सोहळा
परिसरातील अनेक मान्यवर किर्तनकार या शिक्षण संस्थेत घडले आहेत
श्री ह भ प कैलास महाराज भोरे देवदैठण
श्री ह भ प उत्तम महाराज वराट साकत
श्री ह भ प सोपान काका महाराज निगुडे आरंगाव
श्री ह भ प कृष्णा महाराज उगले नायगाव
श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज नगरे खर्डा
श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज कोल्हे कोल्हेवाडी
श्री ह भ प नवनाथ महाराज जाधव दौंडाची वाडी
श्री ह भ प उद्धव महाराज पवळ डोणगाव
श्री ह भ प दत्ता महाराज खवळे सारोळा
श्री ह भ प नामदेव महाराज राऊत सटवाई जवळके
श्री ह भ प विजय महाराज चिंचपूरकर
श्री ह भ प सुनील महाराज मस्के आरणगाव
श्री ह भ प भागवत महाराज दळवी साकत
श्री ह भ प पांडुरंग महाराज कोल्हे कोल्हेवाडी साकत
या सर्व गुणीजन महाराजांचा पुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने हभप दिपक महाराज गायकवाड यांनी केले आहे. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री पंढरीनाथ राजगुरू श्री मृदंगाचार्य हरिदास आबा गुंड गायनाचार्य श्री विष्णु महाराज म्हेत्रे,  बाबा महाराज मुरूमकर श्री भक्ती शक्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथ पोकळे, स्वागताध्यक्ष अमित शेठ चिंतामणी नगरसेवक,  उद्योजक रमेश दादा आजबे कार्याध्यक्ष प्रवीण सानप, सचिव दत्तात्रय सोले पाटील, गोरख घनवट,किरण कुंभार, वैभव भैय्या राऊत, अमित पोटे, अण्णासाहेब मांजरे, नितीन दादा राळेभात, अधिक करून सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.
सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये उत्तम महाराज वराट
 साकतकर यांचे किर्तन होईल व नंतर सन्मान सोहळा पूजन सोहळा होऊन सर्वांना महाप्रसाद मिळेल सर्वांनी उपस्थित रहावे ही सर्वांना संयोजकातर्फे विनंती करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!