जामखेड न्युज——
जय श्रीराम शुगरच्या बाराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
कारखान्याचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार -के .एन .निबे
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रमुख पाहुणे श्री लोंढे साहेब व श्री काळे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला . प्रमुख पाहुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे माजी शास्त्रज्ञ असून गेली सात वर्षे कारखान्याचे टेक्निकल सल्लागार आहेत. कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्रीहरी आबाराव साखरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सविता श्रीहरी साखरे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली.

याप्रसंगी श्री .काळे साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना साखर धंद्या विषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले तसेच लोंढे साहेब यांनी देखील कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .जामखेड येथील साखर व्यापारी जैन काका यांनी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभासाठी शुभेच्छा दिल्या.

विस्तारीकरणासाठी चेअरमन प्रा.एम. एन .नवले सर यांनी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहन दिले. तसेच बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रमानिमित्त सर्व कर्मचारी व शेतकऱ्यांना शुभेच्छा ही दिल्या.

यावेळी बोलताना निबे यांनी कारखान्याच्या विस्तारीकरणाची माहिती दिली. तसेच या विस्तारीकरणासाठी साई कन्स्ट्रक्शन, त्रिमूर्ती इंजिनिअरिंग, मनोज प्रसाद ,साई सृष्टी ,फडतरे इंजिनिअरिंग इत्यादी कंत्राटदारांचे योगदान लाभले .कंत्राटदारांनी जलद गतीने व वेळेत कामे पूर्ण केल्याने निबे यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले. कारखान्याचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली आहे अशी माहिती श्री .निबे यांनी दिली.

कारखाना कार्यक्षेत्रात मागील दोन महिन्यापासून समाधानकारक पाऊस होत असून पाण्याचा प्रश्न मिटलेला असल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे .कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून कारखाना चालवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशी ग्वाही मुख्य शेती अधिकारी मोहिते यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही.बी. निंबाळकर यांनी केले कार्यक्रमासाठी कारखान्याचे चीफ अकाउंटंट एस. ए. शिंदे ,चीफ केमिस्ट एन. डी .चौधरी, मुख्य शेती अधिकारी एम. एम. मोहिते सर्व अधिकारी व उपखाते प्रमुख तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हळगाव चे सरपंच अनिता सुशेन ढवळे ,सोसायटीचे चेअरमन किसन बापू ढवळे ,उपसरपंच आबासाहेब ढवळे ,नवनाथ ढवळे, दत्तात्रय ढवळे ,दादा पुराने ,महेश ढवळे शरद ढवळे, दीपक ढवळे ,तात्या काळे शहाजी ढवळे, मारुती करगळ राजू भैय्या सय्यद व हळगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते. कारखान्याचे जनरल मॅने जर व्ही.बी. निंबाळकर यांनी कार्यक्रम झालेनंतर सर्वांचे आभार मानले.










