प्रदुषण मुक्तीचा व इंधन बचतीचा संदेश देत सायकलवर काश्मीर ते कन्याकुमारी निघालेल्या तरूणांचा तेरा दिवसात 2850 किलोमीटर प्रवास – आता राहिले 950 किलोमीटर अंतर चार दिवसात कन्याकुमारीला पोहचणार

0
236
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सायकलवर निघालेल्या प्रदुषण मुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत जामखेडचे दोन तरूणांनी तेरा दिवसात २८५० किलोमीटर अंतर पार केले आहे व आणखी ९५० किलोमीटर अंतर बाकी आहे चार दिवसात ते अंतर पुर्ण करत कन्याकुमारीला पोहचतील काश्मीर मधील थंड हवा तर कर्नाटक व तामिळनाडू येथील उष्ण हवा याचा सामना करत त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे.
   प्रदूषण मुक्त भारत, इंधन बचत हा नारा आहे, हा प्रवास 10 राज्य मधून होत आहे पैकी फक्त आता शेवटी एक  तामिळनाडू राज्य बाकी आहे, या मध्ये फार तापमान आहे ,काश्मीर मध्ये फार थंडी होती, अणि राजस्थान, कर्नाटक या राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे 36 डिग्री आहे. तरीही या वातावरणाशी जुळवून घेत हा सायकल प्रवास सुरू आहे.
जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट असलेले भास्कर भोरे हे दोन साहसवीर “सायकल रायडींग” अर्थात सायकल वरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून  काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.
    के 2 के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून  दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता जामखेड शहरातील एच. यु. गुगळे पतसंस्थेपासून हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वरांना निरोप देण्यात आला होता.
     डॉ. सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पुर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकल वर जात आसतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत.
   दररोज सोशल मिडीयावर किती प्रवास केला कोठे आहेत हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here