जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणारी साकत ग्रामपंचायतच्या सरपंच पदी मनिषा सर्जेराव पाटील तर उपसरपंचपदी बळीराम बाजीराव कोल्हे यांची आज निवड झाली. सरपंच पदाची निवड जाहीर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. साकत ग्रामपंचायतीकडे जामखेड तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. सरपंच कोण होणार ? मात्र माजी सभापती डॉक्टर भगवान मुरूमकर व युवा नेते हनुमंत पाटील यांच्या गटाने बाजी मारत चौथ्यांदा ग्रामपंचायतवर वर्चस्व राखले आहे.

साकत ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य पंचायत समितीचे सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर व माजी सरपंच हनुमंत पाटील यांच्या गटाकडे सात तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट व साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या गटाकडे सहा जागा आहेत त्यामुळे डॉ. मुरूमकर गटाचाच सरपंच होणार हे निश्चित होते.
सरपंच पदासाठी मनिषा पाटील, रुपाली वराट, जिजाबाई कोल्हे यांनी अर्ज भरले होते तर उपसरपंच पदासाठी बळीराम कोल्हे, राजु वराट, मिलन घोडेस्वार यांनी अर्ज भरले होते. जिजाबाई कोल्हे, मिलन घोडेस्वार यांनी उमेदवारी अर्ज मागे घतले त्यामुळे सरपंच पदासाठी दोन उपसरपंच पदासाठी दोन अर्ज राहीले गुप्त पद्धतीने मतदान दुपारी २ वा मतदान घेण्यात आले.
सरपंच पदासाठी मनिषा पाटील यांना ७ मते पडली , तर रुपाली वराट यांना ६ मते पडली उप सरपंच पदासाठी बळीराम कोल्हे यांना ७ मते पडली ,राजु वराट यांना ६ मते पडली
निवडणुक निर्णय अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी सरपंच पदी मनिषा सर्जेराव पाटील तर उपसरपंच पदी बळीराम बाजीराव कोल्हे यांची निवड जाहीर केली
गावचा विकास हाच माझा ध्यास असुन त्यासाठी डॉ भगवान मुरूमकर, हनुमंत पाटील, सर्व सदस्य व गावकर्यानी सहकार्य करावे असे अव्हान नवनविचीत सरपंच मनिषा पाटील म्हणाल्या
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले की, सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम केल्यामुळे तसेच लोकांनी हॅलो म्हटले की आलो हा फाॅर्मुला वापरल्याने लोकांनी चौथ्यांदा संधी दिली आहे.
निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
नंदकुमार गव्हाणे, साहाय्यक ग्रामविकास आधिकारी राजेंद्र वळेकर तलाठी सचिन खेत्रे यांनी काम पाहिले पोलीस कर्मचारी सचिन पिरगळ ,रमेश फुलमाळी, पोलीस पाटील महादेव वराट होमगार्ड मोरे परमेश्वर , रोहीत हजारे ,यांनी चोख बंदोबस्त ठेवला महसुल कर्मचारी विठ्ठल पुलवळे ग्रामपंचायत कर्मचारी सतिष लहाने, प्रभु पुलवळे
हे हजर होते.