आपल्या प्रगतीसाठी नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे – ज्योती- क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ (नाना) हजारे नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहावे म्हणजे नक्कीच प्रगती होईल.

0
232

 

जामखेड न्युज——

आपल्या प्रगतीसाठी नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे – ज्योती- क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ (नाना) हजारे

नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहावे म्हणजे नक्कीच प्रगती होईल.

“नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहावे म्हणजे नक्कीच प्रगती होईल, तसेच तसेच जेव्हा आपण समाजासाठी काम करतो. तेव्हा समाज आपल्याला डोक्यावर घेतो व आपले नेतृत्व विकसित होते “.
ज्योती- क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ (नाना) हजारे यांचे प्रतिपादन.

सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असताना विविध संकटांना आपणास सामोरे जावे लागते. सामाजिक संघटन चालवत असताना खूप त्रास सहन करावा लागत असतो. परंतु आपण आपले कार्य करत असताना नावे ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपण पुढे चालत राहावे म्हणजे नक्कीच तुमची प्रगती होईल. असे प्रतिपादन ज्योती- क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ (नाना) हजारे यांनी व्यक्त केले.

सावता परिषदेच्या वतीने आयोजित संपर्क अभियान अहमदनगर जिल्हा बैठकीत ते बोलत होते. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत असलेल्या संपर्क अभियाना अंतर्गत अहमदनगर जिल्हा कार्यकारणीची बैठक हॉटेल राज पॅलेस अहमदनगर येथे संपन्न झाली.

या बैठकीचे प्रदेश महासचिव मयूर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

♦ यावेळी यांची होती उपस्थिती
बैठकी प्रसंगी विचार मंचावर प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर, प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू, युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेश दळवी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनिषा ताई सोनमाळी, प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजीव काळे, प्रदेश सचिव बापूराव धोंडे, मराठवाडा अध्यक्ष इंजिनियर शिवानंद झोरे, मराठवाडा संपर्कप्रमुख विष्णुपंत खेत्रे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मोहोळकर, जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष सावता हिरवे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी – तालुकाध्यक्ष व माळी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बैठकीचे सुरुवातीला संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आभार जिल्हाध्यक्ष निखिल शेलार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here