जामखेड न्युज——
नान्नज येथील शाळकरी मुलाचे अपहरण परिसरात एकच खळबळ
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील नंदादेवी येथून
राजेवाडी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रोहन कल्याण कुमटकर याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असून मुलाचे वडील कल्याण नामदेव कुमटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की यातील फिर्यादी चोभेवाडी येथील ३८ वर्षीय शेतकरी कल्याण नामदेव कुमटकर यांचा १५ वर्षीय मुलगा रोहन हा नंदादेवी हायस्कूल, नान्नज येथे शाळेत शिकत आहे.
आज दि. १८ आँक्टोबर रोजी सकाळी १०:४० वाजताचे सुमारास कोणीतरी एका अज्ञात इसमाने फिर्यादीचे अल्पवयीन अपह्रत मुलगा रोहन यास कश्याचे तरी आमिष दाखवून अज्ञात कारणाकरीता फुस लावून पळवुन नेले आहे.
याबाबत अपहृत मुलाचे वडील कल्याण कुमटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि. न. 479/2022 भा.द.वि.कलम 363 प्रमाणे जामखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. भारती हे करत आहेत.