जामखेड न्युज——
गायनाचार्य हरीभाऊ काळे झी टॉकीज तर्फे सन्मानित
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुराआपल्या जादुई आवाजाने परिसरातील नागरिकांना मोहित करणारे हभप गायनाचार्य हरीभाऊ काळे यांना झी टॉकीज तर्फे सन्मानीत करण्यात आले आहे त्यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
हभप गायनाचार्य हरीभाऊ काळे जामखेड, पाटोदा, आष्टी, भुम, परांडा या परिसरात प्रसिद्ध आहेत. भजन, किर्तन सोहळ्यात अनेक ठिकाणी ते उपस्थित असतात. आपल्या जादुई आवाजाने सर्वाना मोहित करतात. त्यांना आवाजाचे जादुगार म्हटले जाते.
दि. १८ रोजी पुणे येथे झालेल्या झी टॉकीजच्या मन मंदिरा कार्यक्रमात गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रम संपन्न झाला यात गायनाचार्य हरीभाऊ काळे यांना सन्मानित करण्यात आले
यावेळी झी टॉकीजचे प्रमुख हेमंत पांचाळ , आण्णासाहेब देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य धाराशिव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपालीताई चाकणकर, प्रसिद्ध काॅमेडियन भाऊ कदम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आतापर्यंत हरीभाऊ काळे यांना सृजन भजन स्पर्धा २०२१ प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तसेच
स्टार प्रवाह तर्फेही सन्मानित करण्यात आले आहे.
भजन किर्तन यामध्ये परिसरात गोड आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गायनासाठी त्यांना बोलावले जाते.
झी टॉकीजच्या मन मंदिरा कार्यक्रमात
गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रमात
सन्माननीय ह. भ. प. हरिभाऊ कोंडीबा काळे
यांना सन्मानित करण्यात आले.
सन्मान पत्रात म्हटले आहे कि,
जय हरी विठ्ठल।। इवलेसे रोप लावियले द्वारी । तयाचा वेलू गेला गगनावरी ।। माऊली, आपण मन मंदिरा आणि गजर कीर्तनाचा या कार्यक्रमांच्या
माध्यमातून झी टॉकीजसोबत जोडले गेला आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. थोर संतांचा वारसा जपत विठुरायाच्या नामस्मरणातून,
समाजप्रबोधनाच्या आपल्या थोर परंपरेला आपण कीर्तनाच्या माध्यमातून पुढे नेत आहात. आपलं हे कार्य असंच अखंडपणे सुरु राहो हि सदिच्छा !
आपणास महाराष्ट्राच्या कोट्यावधी प्रेक्षकांच्या वतीने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. झी टॉकीजकडून आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
हभप गायनाचार्य हरीभाऊ काळे यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. आज साकत येथील गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सोहळ्यात हभप उत्तम महाराज वराट, हभप दिपक महाराज गायकवाड, बिभीषण महाराज कोकाटे, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, प्रा. अरूण वराट, बाजीराव वराट, उत्तरेश्वर वराट, कांतीलाल वराट, महादेव वराट यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.