जामखेड न्युज——
हभप उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या किर्तनाचे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
गेल्या ६७ वर्षापासून साकत मध्ये अखंड विना वादन व नंदादीप सुरू आहे. अशा प्रतिपंढरपुर समजल्या जाणाऱ्या साकत मध्ये वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या किर्तनाचे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाला.

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये हभप यांचे मोठ्या उत्साहात किर्तन झाले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते. कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती

त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले.
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥
वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥
एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥
तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥
अर्थ :- दहिभाटाचा काला खान्यासाथी आम्ही पुन्हा जन्म घेऊ ।।1।।
हा मधुर काला वैकुंठाताहि मिळत नाही ।।ध्रु।।
आम्ही हे काल्याचे घास एकमेवांच्या मुखात घालुत्यापासून मिळणाऱ्या आनंदात हुंबरि घालू ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी वाळवंट हे स्तन उत्तम आहे ।।

तसेच यावेळी हभप कैलास महाराज भोरे, बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, हभप हरीभाऊ काळे, पंचायत समितीचे सभापती संजय वराट, प्रा. अरूण वराट, दिपक महाराज गायकवाड, पंढरीनाथ महाराज राजगुरू, अच्युत महाराज आंबिरकर,अशोक महाराज सपकाळ, रंगनाथ अप्पा भोरे, बापू महाराज शिंदे,
बाबा महाराज मुरूमकर, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रू मुरूमकर, दिपक अडसूळ, खंडू भोरे, बळीराम लोहार, डॉ. राम वराट, भिष्मा वराट, राजाभाऊ मुरूमकर, महादेव वराट, कांतीलाल वराट, राजाभाऊ वराट,

यांच्या सह जामखेड, पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
आज बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत झाले
चौकट
बाजीराव वराट यांच्या नगर येथील नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील तीस विद्यार्थी दररोज आठ दिवस कीर्तनामध्ये हजर होते.