जामखेड न्युज——
संतांच्या विचारांमुळेच महाराष्ट्र एकसंघ आहे- आमदार रोहित पवार
साकत येथील रामचंद्र बोधले महाराज मंदिरासाठी वीस लाख रुपये देणार
अध्यात्म खुप महत्त्वाचे आहे संतांच्या विचारांमुळेच महाराष्ट्र एकसंघ आहे. साकत येथे गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज मंदिर होणे आवश्यक आहे यासाठी वीस लाख रुपये निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवारांनी केली.
साकत येथे श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळा साकत मध्ये मोठ्या सुरू आहे. यासाठी आज आमदार रोहित पवार उपस्थित होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, विठ्ठल वराट, गणेश वराट, रामहरी वराट यांच्या सह ग्रामपंचायत व सेवा संस्था सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, रामचंद्र बोधले महाराज मंदिरासाठी मार्च महिन्यात वीस लाख रुपये निधी देतो. संतांच्या विचाराचा वारसा घेऊन आपणास पुढे जायचे आहे. गीते बाबा मंदिरासाठी सहा कोटी चा निधी दिला सिताराम गटासाठी साडेतीन कोटी रुपये तसेच राशिन येथील जगदंबा मंदिरासाठी साडेतीन कोटी रुपये निधी दिला गोदड महाराज मंदिरासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
साकतच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मंदिराचा सुंदर आराखडा तयार करा मार्च महिन्यात निधी देतो असेही सांगितले.
साकत परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे सोयाबीन शेतात आहे. रब्बी हंगामाची कसलीही पेरणी नाही त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संजय वराट यांनी केली.
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्यामुळे सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना देऊ
ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांनी ताबडतोब कृषी अधिकारी किंवा विमा कंपनी प्रतिनिधी यांना कळवावे असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.