जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश
घाटमाथ्यावर साकत परिसरात अतिवृष्टीने सोयाबीन पीके पाण्यात आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणी परिस्थितीची पाहणी करत ताबडतोब पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकत येथे भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळा कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, माजी पंचायत समितीचे सभापती संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, राजेंद्र पवार, सावरगावचे सरपंच काका चव्हाण, गणेश वराट, पोपट वराट, विजय वराट, भरत वराट, निशिकांत वराट, नंदू मुरूमकर, कोल्हे, सतिश लहाने यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
साकत परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे सोयाबीन शेतात पाण्यात आहे. रब्बी हंगामाची कसलीही पेरणी नाही त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी संजय वराट यांनी केली. त्यामुळे आमदार रोहित पवार कार्यकर्त्यांसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले व परिस्थितीची पाहणी केली आणी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
साकत परिसरात सोयाबीन पीक पाण्यात आहे. रब्बी हंगामाची कसलीही पेरणी नाही. पीक सडून चालले आहे. याची पाहणी आमदार रोहित पवारांनी केली व नुकसान पंचनामे करण्याचे आदेश दिले.
चौकट
जामखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.त्याचे पंचनामे उद्यापासून सुरु होणार आहेत.सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की आपण आपले गावाचे तलाठी कृषी सहाय्यक आणी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे.पंचनामे करत असताना आपली पिक पाहणीची नोंदही लगेच करून घ्यावी जेणेकरून अनुदान देणेकामी अडचण होणार नाही.तहसिलदार योगेश चंद्रे