आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

0
194

 

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन

वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

   

 

 

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आज आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन झाले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.

कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, विठ्ठल वराट, गणेश वराट, रामहरी वराट यांच्या सह ग्रामपंचायत व सेवा संस्था सदस्य उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकत परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तरीही मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवारांनी गावच्या विकासासाठी तसेच गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज यांच्या मंदिर बांधकामासाठी वीस लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले.

हभप उत्तम महाराज वराट त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले. 

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥ध्रु.॥
निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नर्का जाणें ॥३॥
अर्थ
जे देहा विषयी उदास आहेत तेच भक्त जाणावे.त्यांचि आशापाश निवारण झालेले आहे.त्यांचा विषय म्हणजे फक्त नारायण झालेला असतो.त्यांना या संसारातील जन,धन,सगे काहीच आवडत नाहि,अश्या भक्तांच्या मागे पुढे देंव त्यांचे सर्व कष्ट निवारण करण्या साठी उभा असतो.यांना तो कधी संकटात सापडू देत नाही.तुकाराम महाराज म्हणतात सत्य काम जे असेल त्याला सहकार्य करावे नाही तर जो कोणी सत्य कर्मात अडथळा आणतो त्याला नरकात जावे लागते.

 

 
तसेच यावेळी हभप कैलास महाराज भोरे, बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, हभप हरीभाऊ काळे, बाबा महाराज मुरूमकर, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रम मुरूमकर, दिपक अडसूळ यांच्या सह पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

       
श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.  

आज मंगळावर सायंकाळी दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे तसेच बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल. 

 

      तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here