राज्यातील 7639 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती

0
211

 

जामखेड न्युज——

राज्यातील 7639 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती

राज्यातील 7639 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे यात जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नापूर व शिऊर या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

राज्यातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नव्याने
स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे.

या निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १२ नुसार
ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणे आवश्यक आहे. याकरीता दिनांक ३१/०५/२०२२ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरायची आहे.

आयोगाच्या दिनांक ०४/१०/२०२२
च्या सुधारीत अधिसूचनेन्वये दिनांक ३१/०५/२०२२ हा दिनांक अधिसूचित करण्यात आला आहे.

या निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम
राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

३१ मे २२ रोजी प्रसिद्ध केलेली यादी १३आँक्टोबर पर्यंत मतदारयादी डाउनलोड किंवा प्रिंट आऊट काढून मतदारयादी प्रसिद्ध करावी तसेच प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी १३ आँक्टोबर पर्यंत, हरकती व सूचना १३ ते १८ आक्टोबर २०२२ , तसेच प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्धी २१ आँक्टोबर २०२२ पर्यंत निवडून आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here