जामखेड न्युज——
जामखेड पोलीसांच्या तत्परतेने एक लाख सत्तर हजार रुपये किंमतीचे दोन महिन्यांपूर्वी चोरी गेलेले डब्बे दुकानदारास मिळाले परत!!!
दोन महिन्यांपूर्वी जामखेड येथील तोडकरी किराणा दुकानातून कामगाराने इतर आरोपीस हाताशी धरून एक लाख सत्तर हजार रुपये किंमतीचे तेलाचे डब्बे चोरले होते. तसी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. यानुसार पोलीसांनी तपास करत एक लाख सत्तर हजार रुपये किंमतीचे तेलाचे डब्बे हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशानुसार ते दुकानदास परत दिले.
हा कामगार तीन वर्षापासून दुकानात कामाला होता तेलाच्या डब्ब्याला गिराईक आले की, गोडाऊन मधुन माल दिला जात होता पण बिलावर खुन करत नव्हते. नंतर तो डब्बा इतर आरोपीच्या साथीने डब्बे नेत होते व परत विक्री करत होते.
दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी फिर्यादी नामे वसंत नंदकिशोर तोडकरी राहणार खाडे नगर जामखेड यांनी त्यांचे बस स्टॅन्ड समोरील तोडकरी किराना दुकाना तून 01 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 च्या दरम्यान तेलाचे डबे अपहार झाले म्हणून जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 369/ 2022 भा द वि कलम 408 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत होते तपास करत असताना यातील आरोपी नामे लहू बाजीराव सांगळे राहणार कऱ्हेवाडी तालुका आष्टी याचा व इतर आरोपी नामे अलीम उर्फ आलम दादा शेख राहणार नान्नज व सुरेश भगवान गंभीरे राहणार सरदवाडी तालुका जामखेड
यांचा शोध घेऊन कसोशीने तपास करून त्यांच्याकडून गुन्हातील 01 लाख 69 हजार 275 रुपये किमतीचे जेमिनी सोयाबीन, जेमिनी सूर्यफूल, दीपसन सोयाबीन, पामोलीन अशा खाद्यतेलाच्या कंपनीचे 77 तेलाचे डबे तपासा दरम्यान हस्तगत केलेले होते सदरचे तेलाचे डबे आज रोजी माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फिर्यादी वसंत नंदकिशोर तोडकरी यांना परत करण्यात आलेले आहेत. तरी सदर बाबत फिर्यादी यांच्याकडून जामखेड पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात ,पो हे कॉ संजय लाटे ,पो ना अविनाश ढेरे ,पो कॉ आबासाहेब आवारे,पो कॉ विजयकुमार कोळी, पो कॉ विजय सुपेकर,
पो कॉ अरुण पवार यांनी केली आहे.