रावण दहन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय – आमदार रोहित पवार

0
195

 

जामखेड न्युज——

रावण दहन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय – आमदार रोहित पवार

देशात श्री रामावर कोणाचीही मक्तेदारी नाही. आपल्या सर्वांच्या मनात श्रीराम आहे. चांगली वृत्ती व चांगले काम करणाऱ्या सर्वांचा आहे. रामराज्य म्हणजे श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना समान हक्क, न्याय, निस्वार्थी वृत्ती व निर्मळ मनाने कारभार करणे म्हणजे रामराज्य आहे. तसेच भगव्या स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने हा कार्यक्रम होत असून चांगल्याचा वाईटावर, सत्याचा-असत्यावर, धर्माचा-अधर्मावर, नम्रतेचा अहंकारावर झालेला विजय साजरा करण्यासाठी हा रावण दहन कार्यक्रम आहे. दसऱ्याला अनिष्ट चालीरीती व प्रवृत्तींना थारा न देण्यासाठी, त्यांचे दहन करण्याची परंपरा कायम ठेवत आपल्या या संस्कृती आणि परंपरेला अनुसरूनच राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतिचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील किल्ला मैदानावर राज्यातील सर्वात मोठा रावण दहनाचा समारंभ पार पडला. दुरदर्शन धारावाहिक रामायण यात रामाची भुमीका केली ते अरूण गोविल, दिपीका चिखलीया (सीता), लक्ष्मण सुनील लहरी यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले. माजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आहे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, सुरेश भोसले, संजय वराट, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, माजी नगरसेवक मोहन पवार, जामखेड शहराध्यक्ष राजू गोरे, युवक कार्यकर्ते समीर चंदन, जेष्ठ प्रकाश सदाफुले, हरिभाऊ आजबे, राजेंद्र गुंड, अमोल गिरमे, राहुल अहिरे, प्रवीण उगले, अमित जाधव, वकील संघाचे, ॲड. हर्षल डोके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या जनसागरात हा दिमाखदार सोहळा पार पडला.

खर्डा येथील शिवपट्टन किल्ल्यासमोर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मागील दसऱ्याच्या मुहूर्तावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच व ७५ फुटी रावणाच्या प्रतीकृतीचे दहन करण्यात आले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी धनुष्यबाण सोडून सध्या महाराष्ट्रासह देशाला भेडसावत असलेल्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता व दारिद्र्य या १० महत्त्वाच्या समस्या असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अनेक समस्या लिहून दिल्या आणि त्यांचे देखील यावेळी दहन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी बाण सोडून रावण दहन केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. तसेच या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. अशाप्रकारे राज्यात एक नवा विक्रम आ. रोहित पवार यांनी रचला असल्याचं या माध्यमातून पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here