खाडे महाराजांची हायकोर्टाकडून अटकेला स्थगिती, सोमवारी होणार सुनावणी

0
246

जामखेड प्रतिनिधी
                जामखेड न्युज——

खाडे महाराजांची हायकोर्टाकडून अटकेला स्थगिती, सोमवारी होणार सुनावणी

दोन महिन्यांपूर्वी खाडे महाराजांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच खाडे महाराज यांनाही मारहाण झालेली होती याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी मुळे बीड सह नगर जिल्ह्यात वातावरण एकदम ढवळून निघाले होते. खर्डा पोलीसांनी आरोपींना शोधण्यासाठी जंग जंग पछाडले होते. पण खाडे महाराजांची हायकोर्टाकडून अटकेला स्थगिती आणली आहे. सोमवारी सुनावणी होणार आहे.

महाराजांना मारहाण प्रकरणी दोन आरोपींना अटक करत चोवीस तोळे सोने हस्तगत केले होते. महाराजांचा शोध सुरू होता. महाराज दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात भक्तांच्या आश्रयाला असावेत असा अंदाज होता. महाराज यांनी वकिलाच्या वतीने अटकेला हायकोर्टाकडून स्थगिती मिळवली आता कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. यावेळी काय निर्णय लागतो हे महत्त्वाचे आहे.

पाटोदा, जिल्हा बीड तालुक्यातील, हनुमानगड सावरगाव येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांना जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एका मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरोधात जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना खर्डा पोलीसांकडून दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडील सदर गुन्ह्यात चोरी गेलेले २४ तोळे सोने हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.

पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा तपास करून बाजीराव गिते व अरूण गिते यांना ३ आँगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी तपास करून आरोपीकडून २४ तोळे सोने हस्तगत केले आहे. सोमवारी पोलीस कोठडी संपत असल्याने पोलीसांनी सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता आणखी तपासासाठी व इतर तीन आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीसांनी केली असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता.

२९ जुलै रोजी खाडे महाराज यांना घुगे वस्ती मोहरी येथे पाच आरोपींनी मारहाण करत १३ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोने गेले अशी तक्रार खाडे महाराज यांनी केली होती तर खाडे महाराज यांनी लैंगिक शोषण केले अशी ही फिर्याद दाखल करण्यात आली होती. यानुसार खर्डा पोलीसांनी बाजीराव गिते व अरूण गिते या दोन आरोपींना अटक करत त्यांच्या कडून २४ तोळे सोने हस्तगत केले होते.

बुवासाहेब खाडे दोन महिन्यांपासून फरार आहेत

दरम्यान हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर जामखेड तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याने बुवासाहेब खाडे दोन महिन्यांपासून फरार आहेत. जामखेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत नगर येथे एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले गुन्हा दाखल होताच तेथुन फरार झाले होते. सध्या ते दुसऱ्या राज्यात असावेत असा अंदाज आहे.

मागे काही वर्षांपूर्वी महाराजांविषयी एक अश्लील आॅडिओ क्लीप व्हायरल झाली होती त्यावेळी परिसरात खुपच चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महारजांचे भक्त गण आहेत अनेक ठिकाणी महाराज यांची जंगी हत्ती वरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सध्या एखाद्या भक्तांच्या आश्रयाला असावेत असा अंदाज आहे.

चौकट
हनुमान गड सुना सुना!!!
हनुमान गडावर भक्तांची मोठी गर्दी असते. गहिनीनाथ गडावर जाणारे भाविक येता जाता हनुमान गडावर जातात गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे केली आहेत. निसर्गरम्य वातावरण असणाऱ्या गडावर अनेक लोक जातात पण महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यावर गडावर जाणाऱ्या भाविकांची गर्दी रोडावली आहे. गड सुना सुना झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here