जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
हारतुरे व लग्न पत्रिकेत नाव यावे म्हणून मी संचालक झालो नाही तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी संचालक झालो आहे. निश्चितच पाच वर्षांत आगळेवेगळे काम करून वेगळा ठसा निर्माण करून वडिलांचा वारसा पुढे चालविल आता निवडणूक संपली आहे त्यामुळे मी आता संपुर्ण तालुक्याचा पालक आहे. त्यामुळे गट तट न ठेवता संपूर्ण तालुक्यासाठी काम करणार आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करावी असे जिल्हा बॅंकेचे बिनविरोध निवड झालेले संचालक अमोल राळेभात यांनी सांगितले.
नगर जिल्हा बॅकेसाठी संचालक म्हणून अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल साकत सेवा संस्था व ग्रामस्थ यांच्या तर्फे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, चेअरमन प्रा. अरूण वराट, माजी सरपंच कांतिलाल वराट, माजी चेअरमन हनुमंत वराट, सचिव नितीन सपकाळ, दादासाहेब मेंढकर, पोलीस पाटील महादेव वराट, प्रा. युवराज मुरुमकर, बाळासाहेब सानप, कैलास वराट, गणेश वराट, राजाभाऊ वराट, पोपट वराट, वसंत वराट, शिवाजी कोल्हे, महादेव वराट, नवनाथ घोलप, सचिन नेमाने, नागेश वराट, बाळासाहेब वराट, शिवाजी मुरुमकर, अविन लहाने, भरत लहाने, युवराज वराट, काशिनाथ पुलवळे, भिकचंद पुलवळे, रावसाहेब वराट, नानासाहेब लहाने, अॅड शिवप्रसाद पाटील, डॉ. मंगेश कोल्हे, अॅड किरण कोल्हे, हरीभाऊ काळदाते, रामहारी कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की, नगर जिल्हा बॅंकेत वडिलांनंतर मुलगा बिनविरोध संचालक होण्याची पहिलीच वेळ आहे. तसेच सर्वात तरूण संचालक होण्याचा मानही मिळाला आहे. हे सर्वाच्या सहकार्याने झाले आहे. वडिलांच्या कार्यामुळे आजपर्यंत मला एकही निवडणूक लढविण्याची वेळ आली नाही सर्व पदे हि बिनविरोध मिळाली आहेत. सर्वाना विश्वासात घेऊन काम करणार आहे. खरेदी विक्री संघ तोट्यात आसताना चेअरमन झाल्यावर तो योग्य पद्धतीने चालवून नफ्यात आणला तसेच काम जिल्हा बॅंकेत करून वडिलांचा वारसा चालवणार आहे. विमा बाबत स्वायत्तता आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. बॅक विमा उतरवत नाही. विमा केंद्र सरकारच्या आखत्यारीतील विषय आहे. शेतकर्यांनी समुह शेती, गट शेती, बचत गट, यांत्रिकीकरण, खादी ग्रामोद्योग याबाबत मिळणाऱ्या कर्जपुरवठ्याचा लाभ घ्यावा बॅकेमार्फत कर्जपुरवठा करण्यात येईल. असेही राळेभात यांनी सांगितले. तसेच साकत सेवा संस्था हि तालुक्यातील एक आदर्श संस्था आहे असेही ते म्हणाले. सध्या गावात बॅक सुरू करणे शक्य नाही पण ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात येईल असे राळेभात यांनी सांगितले.
बिनविरोध संचालक निवडीबद्दल वडील जगन्नाथ राळेभात, भाऊ सुधीर राळेभात, चेअरमन प्रा. अरूण वराट, हनुमंत वराट व सर्व सेवा संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांचे सहकार्य लाभले असे अमोल राळेभात यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट म्हणाले की, आशिया खंडातील नामांकित बॅक शेतकऱ्यांची कामधेनू नगर जिल्हा बॅक आहे या बॅंकेत संचालक म्हणून अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाली जगन्नाथ राळेभात यांनी पंचवीस वर्षापासून केलेल्या कामाची पावती आहे. सेवा संस्थेच्या माध्यमातून व जिल्हा बँकेच्या माध्यमातून जगन्नाथ राळेभात यानी सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद दिली. त्यांचाच वारसा अमोल राळेभात चालवणार आहेत. सेवा संस्थेमार्फत कर्जपुरवठा सुलभ होतो. यामुळे आपल्या तालुक्याचा विश्वास राळेभात यांच्यावर आहे. खरीप पिकांचा विमा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. रब्बी पिकांसाठी आपला तालुका नाही तो बसावा यासाठी अमोल राळेभात यांनी प्रयत्न करावा असे संजय वराट यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट म्हणाले की,पाच वर्षांत आमचे कोणतेही प्रकरण अडवले नाही सर्व प्रकरणे मंजूर झाली. जगन्नाथ राळेभात यांनी अनेक वर्षांपासून साकत गाव दत्तक घेतल्याप्रमाणे काम केले तात्यांनी रूग्णवाहिकेची मागणी केली व खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी ताबडतोब दिली यामुळे तालुक्यातील लोकांचा फायदा झालेला आहे. अमोल राळेभात यांनी जिल्हा सहकारी बँकेची शाखा साकत गावात सुरू करावी अशी मागणी केली.
चेअरमन प्रा. अरूण वराट यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव वराट यांनी प्रास्ताविक कैलास वराट यांनी तर आभार कांतिलाल वराट यांनी मानले.