Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या रक्तदाता हा रक्तपेढीचा आत्मा आहे – डॉ. विलास मढीकर जामखेड तालुका...

रक्तदाता हा रक्तपेढीचा आत्मा आहे – डॉ. विलास मढीकर जामखेड तालुका रक्तदान करण्यात आघाडीवर आहे- पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड जनकल्याण रक्तपेढी व डी. बी. खैरनार फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

0
332

जामखेड न्युज——

रक्तदाता हा रक्तपेढीचा आत्मा आहे – डॉ. विलास मढीकर

जामखेड तालुका रक्तदान करण्यात आघाडीवर आहे- पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

जनकल्याण रक्तपेढी व डी. बी. खैरनार फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

तालुक्यात रक्तदानाची मुहूर्तमेढ खैरनार दादांनी सुरू केली. जनकल्याण रक्तपेढीला २३ वर्षे झाले येथे वीस वर्षे संकलन करत आहोत. ना नफा ना तोटा तत्वावर २३ वर्षे काम सुरू आहे. गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देतो. अनेक वेळा रक्कदात्यांना बोलावून रक्त उपलब्ध करून देतो. रक्तदाता हाच रक्तपेढीचा आत्मा आहे
असे मत जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. विलास मढीकर यांनी व्यक्त केले.

कै. डॉ. डी. बी. खैरनार तथा दादा यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते विसावे वर्षे आहे. दरवर्षी शंभर पेक्षा जास्त रक्तपिशवी संकलन होते. अनेक रक्तदाते उत्फुर्त पणे दरवर्षी रक्त दान करतात.

यावेळी अध्यक्ष वसंतराव झेंडे, शुभहस्ते पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंतराव झेंडे, डॉ. विलास मढीकर, डॉ. डी. बी. खैरनार फाऊंडेशन चे सदस्य. डॉ. पी. बी खैरनार, डॉ. प्रमोद खैरनार, प्रसिद्ध व्यापारी रमेश गुगळे, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, डॉ. तनय खैरनार, ज्ञानेश्वर अंदुरे, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, शरद कार्ले, डॉ. प्रताप गायकवाड, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्रविण चोरडिया, माजी प्राचार्य अनंता खेत्रे
यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कै. खैरनार दादा व सुरेश कुलथे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, डॉ. खैरनार यांनी सुरू केलेला रक्तदान समाजसेवेचा यज्ञ अखंड सुरू आहे. यामुळे सर्व फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

जामखेड तालुका हिरिरीने रक्तदानात भाग घेतो. त्यामुळे जिल्ह्यात जामखेड तालुका आघाडीवर आहे. रक्तपेढी योग्य गरजू लोकांपर्यंत रक्त पोहोचवतात. प्रत्येकाने रक्तदान करणे आपले कर्तव्य समजावे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!