जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने करिअर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन
नोकरी व व्यवसाय करण्यासाठी नक्कीच मदत होणार!!
सध्याचा काळ हा व्यवसाय व स्टार्ट अप्सचा आहे, वाणिज्य क्षेत्रात करिअरच्या विविध संधी आहेत, विद्यार्थ्यांनी योग्य ते कौशल्य आत्मसात केले तर त्यांना नोकरी व व्यवसाय करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

हीच गोष्ट ओळखून विद्यार्थ्यांपर्यंत करिअरच्या वेगवेगळ्या संधी पोहोचाव्यात व त्यांनी कोण कोणते आवश्यक कौशल्य आत्मसात करावेत यासाठी जामखेड महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने करिअर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी निलया एज्युकेशन ग्रुप पुणे यांचे संचालक डॉ.अविनाश शिरसाट हे प्रमुख वक्ते होते, विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स यावर विशेष भर दिला तर विद्यार्थी आवडत्या क्षेत्रात आपले करिअर बनवू शकतात, पारंपारिक शिक्षण पद्धती सोबतच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस करावेत असे आवाहन डॉ.शिरसाठ यांनी केले
ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी हा होतकरू आहे परंतु त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे, योग्य दिशा मिळाली तर आपले विद्यार्थी नक्कीच विविध क्षेत्रात चमकू शकतात असा खंबीर विश्वास वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. काळे डी.वाय. यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध संसाधनांचा वापर आपल्या विकासासाठी करून घ्यावा तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी असेच करिअर गायडन्सबद्दल कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित करू असे आश्वासन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील नरके सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये केले..
या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे प्रा.देशमुख ऋषिकेश, प्रा.राऊत नितीन, प्रा. बोथरा मॅडम तसेच बीबीए (सीए) विभागप्रमुख प्रा. संजय राऊत, प्रा. जय घायतडक,प्रा.किंबहुने मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले










