बाॅम्बची अफवा पसरणाऱ्यास जामखेड न्यायालयाने सुनावली पंधरा दिवसांची कोठडी!!

0
166

जामखेड प्रतिनिधी
               जामखेड न्युज——

बाॅम्बची अफवा पसरवणाऱ्यास पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्या दिनेश सुतार याला दुसऱ्या गुन्ह्यात जामखेड न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुतार याने मुंबई कंट्रोलला दिलेल्या खबरेवरून बालाजी त्यानंतर दिनेश सुतार याला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी मुंबई येथे तत्काळ अटक केली.

सुतार याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याने त्याचा ताबा घेऊन गुरुवारी ( दि. २२ ) त्याला ३५४ या कलमाखालील गुन्ह्यात जामखेड न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जामखेड पोलिसांनी दिली.

मेडिकलसह संपूर्ण परिसराची जामखेड पोलिसांसह नगर येथील बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली होती. मात्र तपासाअंती बॉम्ब ठेवल्याची केवळ अफवा असल्याचे समोर आले होते.
या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here