Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त वीस तास १२५ वाचकांनी केले ज्ञानेश्वरी पारायण जामखेड येथील विठ्ठल...

ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त वीस तास १२५ वाचकांनी केले ज्ञानेश्वरी पारायण जामखेड येथील विठ्ठल मंदिरात एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

0
194

जामखेड न्युज——

ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त वीस तास १२५ वाचकांनी
केले ज्ञानेश्वरी पारायण, 
जामखेड येथील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

 

श्रीज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त जामखेड शहरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी (दि.१८)एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यामध्ये 125 वाचक सहभागी झाले होते. सकाळी सात वाजता पारायण सोहळा सुरू झाला होता तो १९ तारखेला पहाटे तीन वाजेपर्यंत पारायण सोहळा सुरू होता.

शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांच्या मनावर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अधिराज्य गाजवीत आहे,या ग्रंथाचे वाचन कोणी महिन्यात करतात,कोणी 15 दिवसात तर कोणी आठ दिवसात करतात परंतु विठ्ठल मंदिर जामखेड येथील भाविकांनी हभप बागडे सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ज्ञानेश्वरीचे पारायण फक्त एकाच दिवसात पूर्ण करण्यासाठी शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आणि अतिशय उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सुमारे वीस तास पारायण सोहळा सुरू होता.

गेल्या दोन वर्षापासून श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने ह.भ.प. श्री विजय महाराज बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक दिवसीय श्री ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येते. त्यात अनेक वाचक सहभागी होतात. कोरोना काळामध्ये यामध्ये खंड पडला होता. येत्या शुक्रवारी ज्ञानेश्वरी जयंती आहे. परंतु नोकरदारवर्गाला व विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे म्हणून यावर्षी सुट्टीच्या दिवशी, रविवारी सकाळी सात वाजता या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.

जामखेड शहराच्या मुख्य बाजारपेठेत श्रीविठ्ठल रुक्मिणी पुरातन मंदिर आहे. सुमारे 55 वर्षांपूर्वी शहरातील भक्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर गेल्या पाच वर्षापूर्वी मंदिर समितीच्या पुढाकाराने व परिसरातील दानशूर भक्तांच्या सहकार्याने या मंदिराचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहे. सभामंडपामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत नामदेव महाराज, संत संताजी जगनाडे महाराज, संत गाडगेबाबा, संत सावता महाराज, संत जळोजी महाराज, संत मळोजी महाराज, विश्वकर्मा या मूर्ती आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे प्रशस्त व सुसज्ज मंदिर शहरातील भाविकांसाठी पारमार्थिक साधनेच्या दृष्टीने वरदान ठरले आहे.

येथे १७ वर्षापासून सकाळी महापूजा व विष्णू सहस्त्रनाम, दर सोमवारी व गुरुवारी भजन, प्रत्येक एकादशीला कीर्तन, संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बीजोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, तसेच गेल्या २८ वर्षापासून मार्गशीर्ष महिन्यामध्ये भागवताचार्य श्री नंदकिशोरजी महाराज पुराणिक जालना यांची श्रीमदभागवत कथा, ५८ वर्षापासून श्रीकृष्ण जन्मानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह अशी वर्षभर मोठ्या उत्साहात कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडतात. व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना या ठिकाणी निमंत्रित केले जाते त्यामुळे येथील प्रत्येक कार्यक्रम हा भक्तांसाठी एक पर्वणीच असतो आज भक्तिमय वातावरणात पारायण सोहळा संपन्न झाला
यावेळी हा पारायण सोहळा घडवून आणण्यासाठी ह भ प बागडे सर,गुलाबराव जांभळे,चांदेकर सर,ह भ प पंढरीनाथ राजगुरू, आबासाहेब वीर, दिनकर जाधव,लक्ष्मीकांत देशमुख ,मिलिंद ब्रह्मे,रंगनाथ राजगुरू,अंकुश राजगुरू,आनंद बांबरसे,व विश्वदर्शन संपूर्ण टीम यांनी परिश्रम घेतले
तसेचप्रत्येक 2 तासाला चहा पाणी व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. दोन वेळा जेवणाची सोय करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!