- जामखेड न्युज——
- तालुक्यातील नान्नजमध्ये सहा बाॅम्ब च्या अफवेमुळे एकच गोंधळ अफला फसरविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये सहा बाॅम्ब ठेवले आहेत. असा फोन मुंबई येथील नियंत्रण कक्षाला करण्यात आला त्यामुळे नियंत्रण कक्षाने ताबडतोब जामखेड पोलीस स्टेशनला माहिती व फोन नंबर दिला जामखेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता कोठेही बाॅम्ब नाही ही अफवा पसरवली आहे. जामखेड पोलीसांनी अफवा फसरविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काल दिनांक १८ रोजी सकाळी ९.३० च्या आसपास मुंबई नियंत्रण कक्ष येथुन फोन आला की, जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये सहा बाॅम्ब ठेवले आक्षेप आहेत तेव्हा जामखेड पोलीसांनी घटनास्थळी नान्नजमध्ये जाऊन
पाहणी केली असता येथे बाॅम्ब आढळले नाहीत तेव्हा आरोपी फोन करणारा दिनेश सुतार रा.पत्ता माहित नाही ( मो नं 7517336917) याच्या विरोधात जामखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रविवार दि. १८ रोजी सकाळी यातील आरोपी याने त्याचा मोबाईल क्रमांक 751733 6917 यावरून मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई यांना नान्नज गावामध्ये मध्ये सहा बॉम्ब ठेवले आहेत व त्यास बालाजी मेडिकलने मदत केली आहे असे दहशतीचे वातावरण निर्माण करणारे खोटी माहिती दिली आहे वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून गुन्हा रजि दाखल केला आहे.
सहाय्यक फौजदार शिवाजी भोस यांच्या फिर्यादी नुसार
.रजि.नं. व कलम :- I 439/2022 भा.द.वि. कलम 177,182,505(1)( B) प्रमाणे दिनेश सुतार रा.पत्ता माहित नाही( मो नं 7517336917) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करत आहेत.