जामखेड न्युज——
सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण महत्वाचे – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
विविध स्पर्धत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
समृद्धी पतसंस्थे मार्फत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार.
सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण महत्वाचे असून यासाठी शालेय जीवनातकष्ट केले तर पुढील आयुष्य सुखाचे जातील त्यासाठी चांगले शिक्षण घेतले तर सामाजिक व कुटुंबाची आर्थिक उन्नती होईल असा विश्वास गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा आणि समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२ या अनुषंगाने रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथे घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी तसेच MHT-CET या परीक्षेत 90 पेक्षा जास्त टक्के मिळवणारे विद्यार्थी असे एकूण 44 गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा आणि समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले कि, मुलांना पालकांनी परिस्थीची योग्य जाणीव करून देत शिक्षण देणे महत्वाचे आहे त्यामुळे मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव होऊन आभ्यासाकडे लक्ष देतील याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात सातत्याने गरिबी, बेरोजगारीचे दृष्टचक्र चालत राहिले आहे. त्यामुळे ते थांबवायचे असेलतर विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन उच्च शिक्षित होऊन स्वताची व कुटुंबाची आर्थिक प्रगती करणे क्रमप्राप्त आहे.विद्यर्थ्यांच्या पाठीवर समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थाच्या चेअरमन आरती दीपक देवमाने यांनी विद्यर्थ्याना सन्मान चिन्ह देऊन जी थाप दिली आहे ती महत्वाची असून यातून अनेक विद्यर्थी प्रेरणा घेतील त्यामुळे पतसंस्था ने सामाजिक जबाबदारीतून केलेल्या कामाची समाज देखील दखल घेईल असे मत जामखेड चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.
चौकट
शाळेच्या बाबतीत प्रामाणिक प्रयत्न करू- आरती देवमाने
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथे घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थीचा सन्मान करणे व त्यांच्या मिळालेल्या यशा मध्ये समृद्धी परिवाराला सहभागी करून घेतल्याने मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीचे कायम ऋणी राहू तसेच शाळेच्या बाबतीत जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. संस्थेच्या माध्यमातून अनेक युवा उद्योजक यांना सहकार्य करत असल्याचे समृद्धी पतसंस्थाच्या संस्थापक अध्यक्षा आरती देवमाने यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी भजनावळे , बाजीराव पठाडे(स्कुल कमिटी सदस्य) प्रशांत पाटील, डॉ ईश्वर हजारे,महावीर पोफळे (अध्यक्ष व उपाध्यक्ष,सदस्य शाळा व्यवस्थापन समिती ) डॉ दीपक वाळुंजकर, अनिल सरोदे, शंकर ढगे, , लहानु आव्हाड, प्रभाकर हजारे, गणेश देवमाने, कांतीलाल वाळुंजकर , संदीप काळे, दीपक देवमाने, संदेश हजारे, मुख्याध्यापक एम आर सुपेकर व आरती दीपक देवमाने,प्रास्ताविक शिंदे एस एल,सूत्रसंचालन येवले बी बी आभार एस के नाळे , बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे पालक,
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पारितोषिक वितरण विशेष सहाय्य व्ही बी थेटे,ए आर रणखांब,बी पी रोही,व्ही इ ओव्हाळ सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.