जामखेड न्युज——
जामखेड मिडिया क्लबच्या वतीने एनएमएमएस परिक्षेत यश मिळविणाऱ्या ज्ञानेश्वरी भोगील तसेच बुद्धिबळ व चित्रकला स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल आयुष बोधले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पूभाई सय्यद, अविनाश बोधले, धनराज पवार, किरण रेडे, संतोष गर्जे, अजय अवसरे, राजू भोगील, शिवाजी गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ज्ञानेश्वरी भोगील एनएमएमएस परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल तसेच आयुष बोधले याने बुद्धिबळ व चित्रकला स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल मिडिया क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना दत्तात्रय राऊत म्हणाले की, मुलांनी अधिकाधिक यश संपादन करावे व आपले नावलौकिक करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण रेडे यांनी तर आभार सुदाम वराट यांनी मानले.