नीट व जेईई परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नवीन मराठी ( लोकमान्य ) शाळेच्या वतीने सन्मान

0
186

 

जामखेड न्युज——

Jee व Neet परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नवीन मराठी ( लोकमान्य ) शाळेच्या वतीने सन्मान

लोकमान्य तरुण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित, नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेडच्या वतीने Jee व Neet परीक्षेत यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आज मान्यवराच्या हस्ते शाळेत संपन्न झाला.

यामधे चि. नंदकिशोर देशमुख याने Jee या परीक्षेत तर चि. सुमित अजय वराट याने Neet परीक्षेत भरीव असे यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत आज सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. उमेश काका देशमुख होते.

कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र काका देशपांडे ,चि. निखिल देशमुखचे बाबा तथा संस्थेचे संचालक श्री. नंदकिशोर देशमुख,आई सौ.सुरेखाताई देशमुख,बहीण कु. नमिता देशमुख तर चि. सुमित वराट याचे बाबा डॉ. श्री. अजय वराट व डॉ.सौ.स्वातीताई वराट हजर होत्या.
यावेळी मनोगत व्यक्त करते वेळी निखिल देशमुख याने स्वतः वर विश्वास व अभ्यासात सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे सांगितले याशिवाय अपयश आले तरी खचून न जाता अभ्यास केला तर यश नक्की येते असे असे आपल्या मनोगतामधे व्यक्त केले.
सुमित वराट याने देखील 11 व 12 ला अभ्यास कसा करावा या विषयी मुलांना मार्गदर्शन केले तर डॉ. वराट यांनी मुले जर मोबाईलपासून दूर राहिले तर नक्कीच मुलांना त्याचा फायदा होईल असे सांगितले या शिवाय नमिता देशमुख हिने देखील आपले मनोगत व्यक्त करताना निखिल कशा प्रकारे अभ्यास करत होता व कोणताही क्लास न लावता त्याने यश संपादन केले हे विशेष आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उमेश काका देशमुख यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले.कोणतीही गोष्ट मनापासून व सातत्य ठेऊन केली तर यश नक्की मिळते असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास इयत्ता 5 वी,8वी व 9 वीचे विद्यार्थी हजर होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री. बांगर सर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here