लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिंगवी चष्माघर व आनंदऋषीजी नेत्रालय नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

0
252

जामखेड प्रतिनिधी

लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय सुंदरबाई कन्हैयालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठानच्या प्रेरणेने शिंगवी चष्माघर जामखेड आनंदऋषीजी नेत्रालय नगर यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येणार आहे शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे तरी गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंगवे चष्माघरचे संचालक अभय शिंगवी यांनी केले आहे.

 

शिंगवी चष्माघर जामखेड तर्फे १९८४ पासून म्हणजे ३७ वर्षापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते आतापर्यंत दोन लाख दहा हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे यातील नव्वद हजार रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील तसेच जामखेड, करमाळा, पाटोदा, आष्टी, भूम, परांडा सह अनेक तालुक्यातील रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.

शिबीरातील सुविधा पुढीलप्रमाणे असतील
मोफत शस्त्रक्रिया करून लेन्स अल्पदरात बसविण्यात येईल.

शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची तपासणी नेत्रतज्ज्ञामार्फत केली जाईल.

 

शिबीरात मोफत औषधोपचार,

काळा चष्मा, राहण्याची व जेवणाची सोय मोफत असेल

जामखेड ते नगर येण्या जाण्याची मोफत सोय असेल.

यावेळी जामखेड न्युजशी बोलताना अशोक शिंगवी म्हणाले की, गेल्या ३७ वर्षापासून आम्ही गोरगरीब रूग्णांना दृष्टी देण्याचे काम करत आहेत. आम्ही कोणतेही शासकीय अनुदान घेत नाही. आतापर्यंत नव्वद हजार रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. दर सव्वा महिन्याला आम्ही हे शिबीर आयोजित करतोत. सर्व शस्त्रक्रिया आतापर्यंत यशस्वी झालेल्या आहेत.
गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here