आमदार रोहित पवार लाठी-काठी फिरवत गणपती मिरवणुकीत

0
184

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार लाठी-काठी फिरवत गणपती मिरवणुकीत

पुण्यात यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीला मोठ्या दिमाखात, आनंद उत्साहात सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीसमोर युवांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी या पथकासोबत कर्जत- जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी ही लाठ्या-काठ्या फिरवण्याचा आनंद घेतला , आमदार रोहित दादा लाठ्या -काठ्या फिरवायला सुरूवात केली अन तरुणांनी एकच जल्लोष केला.

यानिमित्ताने तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम आमदार रोहित दादांनी केले.

आमदार रोहित पवार युवकांचे आयडाँल म्हणून संपूर्ण राज्यातील युवक त्यांच्याकडे पहातात. दोन वर्षानंतर होत असलेल्या या गणेशोत्सव आमदार रोहित दादांनी गेली दहा दिवसा पासून राज्यातील गणेश मंडळांना वेळ दिला. कर्जत-जामखेड बरोबरच पुण्यासह राज्याच्या विविध भागातील मंडळाला भेट देऊन त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.दोन दिवसापूर्वी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एका मंडळाच्या गणपतीची आरती रोहित दादांनी केली.आज दिवसभर त्यांनी अनेक पुण्यातील मंडळांना वेळ दिला. ऐवढेच नाही तर विसर्जन मिरवणूकीत सहभागी होऊन गणेशभक्तांचा उत्साह वाढविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here