सावधान!!!! जामखेड मध्ये पसरतोय लम्पी स्कीन डिसीजचा धोका, जनावरांचा आठवडे बाजार बंद, २६ गावांत रेड अलर्ट

0
274

जामखेड न्युज——

सावधान!!!!

जामखेड मध्ये पसरतोय लम्पी स्कीन डिसीजचा धोका, जनावरांचा आठवडे बाजार बंद, २६ गावांत रेड अलर्ट

जामखेड तालुक्यात आत्तापर्यंत आठ गावांमधून लंपी स्कीन आजाराचे नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये मोहरी, गवळवाडी, लोणी, जवळा, गुरेवाडी, पिंपळवाडी, बांधखडक, जमादारवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी मोहरी येथील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तालुक्यात आत्तापर्यंत सात एपीसेंटर तयार करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे.

 

या सर्व गावातील जनावरांची काळजी घेण्याबाबत पशुपालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतच्या मदतीने संबंधित गावांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आलेले आहे. जामखेड मध्ये लंपी स्कीन डिसीज वेगाने पसरत असून जनावरांचे बाजारही बंद करण्यात आलेले आहेत. याबाबत सर्व स्तरावरून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत असून आत्तापर्यंत 11000 जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. सदर आजाराचे कोणतेही लक्षणे दिसताच पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा ग्रामपंचायतला संपर्क करावा असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

एपिसेन्टर नुसार रेड अलर्ट गावे-
१. मोहरी- मोहरी, जायभायवाडी, गवळवाडी, गीतेवाडी
२. लोणी- लोणी, बालगव्हान, आनंदवाडी, वाकी, दरडवाडी
३. जवळा- जवळा व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व वस्त्या
४. गुरेवाडी- गुरेवाडी, खूरदैठण, घोडेगाव, धोंडपारगाव
५. पिंपळवाडी- पिंपळवाडी, कोल्हेवाडी, साकत
६. बांधखडक- बांधखडक, नायगाव, नाहुली
७. जामदारवाडी- जामदारवाडी, चुंबळी, काटेवाडी, बटेवाडी, सारोळा, जामखेड शहर पूर्ण. अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड.यांनी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here