जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
- लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जामखेडचा जनावरांचा बाजार बंद!!! शेळ्या, मेंढ्यांचा बाजार भरणार
परिसरातील सर्व पशुपालक शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव यांच्या 8 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार लम्पी रोगाच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शनिवारी पासून आठवडे बाजार राहणार बंद राहणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी राठोड यांनी सांगितले.
यामध्ये गाय, बैल,म्हेस यांचा बाजार बंद परंतु शेळी मेंडी यांचा बाजार मात्र राहणार सुरू असे सांगितले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव यांच्या 8 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार लम्पी रोगाच्या प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तेव्हा शासनास सहकार्य करावे आहे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक व सचिव यांनी केले आहे.