जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे तसेच सर्वाना विश्वासात घेऊन कारभार केल्याने व सत्तेत सर्वाना संधी दिली यामुळे चौथ्यांदा साकत ग्रामपंचायत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या ताब्यात आली आहे.

डॉ. भगवानराव मुरुमकर व हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या उमेदवार जिजाबाई देवराव कोल्हे या होत्या तर संजय वराट व अरूण वराट यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवार मैना शिवाजी कोल्हे या होत्या. दि 12 रोजी मतदान पार पडले व मतदानानंतर लगेच मतमोजणी झाली यात डॉ भगवान मुरुमकर व हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवार जिजाबाई देवराव कोल्हे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यामुळे चौथ्यांदा साकत ग्रामपंचायत डॉ. भगवान मुरुमकर यांच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीसाठी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव साळवे व प्रमोद कुटाळे यांनी काम पाहिले तर मतमोजणी अधिकारी म्हणून नंदकुमार गव्हाणे हे होते.
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले की, विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आम्ही सत्तेत आसताना केलेल्या विकास कामांमुळे जनतेने चौथ्यांदा संधी दिली आहे. आम्ही सत्तेवर असलो तरी जमिनीवर राहुन जनतेची कामे करतो ” हॅलो म्हटले की आलो ” हा फाॅर्मुला आतापर्यंत वापरला आहे तसेच सत्तेत सर्वाना संधी दिली जाते सर्वाना विश्वासात घेऊन काम करतोत यामुळे परत संधी मिळत आहे.
निवडणूकिच्या कामात विरोधकांनी दादा काकांची दुकानदारी बंद करू असे सांगितले होते पण जनतेने परत दादा काकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत सत्ता दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे सत्तेचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. सत्तेत सर्वांना सहभागी करत सर्वाना संधी देणार असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले.