संजय वराट (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका कोमल पाटोळे यांचा बहारदार कार्यक्रम     लोकप्रिय आमदार रोहित पवारांनी दिल्या शुभेच्छा

0
593

 

जामखेड न्युज——

 

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व साकतचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय वराट सर यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील युवकांनी एकत्रित येत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका कोमल पाटोळे यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी साकत गटासह तालुक्यातील युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रसिद्ध गायिका कोमल पाटोळे यांनी आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. युवकांसह वयोवृद्धही गाण्याच्या ठेक्यावर थिरकले कार्यक्रमानंतर सर्वाची जेवणाची सोय करण्यात आली होती. शेवटी संजय वराट सर यांनी उपस्थित युवक ,आबालवृद्ध, माताभगिनी यांचे आभार मानले

कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या प्रत्येक आमदार रोहित पवार कार्यक्रमासाठी येणार होते पण अचानक रायगडला गेल्यामुळे त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. 

वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, मंगेश आजबे, चंद्रकांत राळेभात पाटील, शहाजी राळेभात, अमोल राळेभात, पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, मोहाचे सरपंच शिवाजी डोंगरे, अॅड हर्षल डोके, काका कोल्हे, बबन देवकाते, भगवान गिते, सुरेश वराट, प्रा. अरूण वराट, पोलीस पाटील महादेव वराट,

चेअरमन कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, डॉ. सुनिल वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, सदाशिव वराट, हरीभाऊ मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, विठ्ठल वराट, बळी कोल्हे, राजस्थान मार्बलचे शहादेव वराट, पोपट वराट, उपचेअरमन दादा नेमाने, कोल्हेवाडीचे चेअरमन लक्ष्मण कोल्हे,युवराज वराट, अविन लहाने, दादा लहाने, भरत लहाने, नारायण लहाने, राजाभाऊ वराट, रामहरी वराट, बिभीषण वराट, अजित वराट, दादा वराट, योगेश वराट, नारायण मुरूमकर, युवराज मुरूमकर, बाळासाहेब सानप, महादेव जिजाबा वराट, बाळू वराट, कृषा पुलवळे, विजय वराट, राम जावळे, साईनाथ जावळे, ज्ञानेश्वर वराट, आप्पासाहेब वराट, सोमनाथ वराट, प्रकाश वराट, द्वारकादास वराट, बाळू सानप, संतोष वराट, शहादेव कोल्हे, जयराम कोल्हे, गुलाब कोल्हे, विशाल नेमाने, रामभाऊ भोरे, राजकुमार थोरवे, महादेव मत्रे, सचिन वराट, अतुल दळवी, आश्रू सरोदे सह साकत गणातील देवदैठण, मोहा, सावरगाव, शिऊर, झिक्री, पाडळी, जातेगाव, दिघोळ, मोहरी, तेलंगशी, धामणगाव, राजुरी येथील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसाचा भव्य -दिव्य कार्यक्रम म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची नांदीच आहे अशी चर्चा संपूर्ण साकत गटात सुरू झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here