जामखेड न्युज—–
घाटमाथ्यावर साकत परिसर सोयाबीनचे आगार म्हणून ओळखला जातो. या वर्षी पावसाचे ओढ दिल्याने एक महिना उशिरा पेरणी झाली. पेरणीनंतर सतत ढगाळ वातावरण यामुळे सुरूवातीच्या काळात गोगलगायचा प्रादुर्भाव झाला आणी आता सोयाबीनचे पाने कुरतडणाऱ्या आळ्या दिसत आहेत. त्यामुळे पिकांवर पडणारा रोगराईचा फेरा शेतकऱ्याची पाठ सोडत नाही.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) अडचणीत सध्या भर पडली आहे. कारण सोयाबीन (Soybean) पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


महागड्या औषधांची फवारणी करून हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्याची सध्या शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील येवला तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सद्यस्थितीत सोयाबीन मोठी होऊन फुलोरा अवस्थेत असताना त्यावर पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही अळी पानांमधील अन्न द्रव्य शोषून घेत असल्याने पानांवर छिद्रे पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झालेत.
या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी औषध फवारणी करण्याची वेळ सध्या बळीराजावर आली आहे. मात्र अळीचा प्रादुर्भाव पाहता त्याचाही कितपत फायदा होईल, हे सांगता येणं कठीण असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अनेक तणनाशक औषधे फवारणी करूनही तण उगवले आहे शेतकऱ्यांनी तण काढले आहे. आता पाऊसही उघडला आहे याचबरोबर सोयाबीन पिकांवर आधीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच पावसाने उघड दिल्याने पिकेही माना टाकू लागल्या आहेत.









