जामखेड न्युज——
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नोकरी आपल्या दारी अशा टॅगलाईन देत होतकरू शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना या महोत्सवामध्ये निमंत्रित केले जात आहे. तरी आष्टा गटातील युवक युवतींनी या मेळाव्यात सहभागी होऊन आपले नौकरीचे स्वप्न साकार करावे असे आवाहन आष्टा गटाचे जेष्ठ नेते महादेव महाजन व मतकुळीचे सरपंच बबनराव डोके यांनी केले आहे.

आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त साठ पेक्षा अधिक कंपन्यांना आमंत्रित करून होतकरू तरुणांना नोकरी देण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं आणि आगळवेगळे पाऊल मानले जात आहे. आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आमदार झाल्यापासून जनतेच्या हिताचे काम केले असून शेतकऱ्यांना दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


आता होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सुशिक्षित युवकांना नोकरी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल वाढदिवसानिमित्त उचलले आहे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील होतकरू व सुशिक्षित युवकांना नोकरी महोत्सवा मधून नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून या महोत्सवामध्ये 60 कंपन्या सहभाग घेणार आहेत.

तरी होतकरू युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नेते महादेव महाजन व बाबन डोके यांनी केले आहे




