जामखेड न्युज—–
जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करा ध्येयाच्या मागे झपाटून लागा यश तुमच्याच हातात आहे.
व्यासंग हवा, वाचन हवे, प्रचंड मेहनत हवी यश तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार असे शिवचरित्रकार गणेश भोसले यांनी सांगितले.

श्री साकेश्वर विद्यालयात शिवचरित्र कार गणेश भोसले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, अण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश भोसले यांनी सांगितले की
आपल्या कर्तुत्वाने शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने जगात नावलौकिक केला. आरमार उभारले, इंग्रजांना धडा शिकवला, महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले, ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सर्वात श्रीमंत आहे. जिंकण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. जो संघर्ष करतो तो यशस्वी होतो. यश मिळाले कि जग सलाम करते.
स्वत: ला ओळखा, प्रयत्न करा, ध्येय ठरवा, झपाटून कामाला लागा यश हमखास मिळणारच!! आपण ज्ञान मिळवले पाहिजे आपली जगात ख्याती होणार जग आपल्याला सलाम करणार!!!


यावेळी अफजलखान वध, शाहिस्तेखान हल्ला. तसेच जीवनात प्रचंड संघर्ष करून यश मिळवणारे क्रिकेट पटू, तसेच अरूनिमा सिन्हा यांच्या बद्दल माहिती दिली.

गणेश भोसले यांच्या विषयी थोडक्यात माहिती
गणेश भोसले पेशाने शिक्षक सुप्रसिद्ध शिव वख्याते प्रेरणादायी वक्ते, सन २०१९ मध्ये समाजभूषण पुरस्कार, २०२१ नागरी एंव पर्यावरण संरक्षण संस्था दिल्ली आंतरराष्ट्रीय बेस्ट परफाॅरमन्स पुरस्कार, यशाचा महामंत्र हे पुस्तक थोड्याच दिवसात प्रकाशित होत आहे. आपल्या तेजस्वी वाणीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कर्नाटक, गोवा, तेलंगणा अशा राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नेमके जगायचे कुणासाठी? तुम्हीच आहात तर तुमच्या जीवनाचे शिल्पकार अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन गडकिल्ले संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार, शेतकरी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाना दोन लाख रुपयांचा निधी संभाजीराजे भोसले यांच्या कडे बहाल केले.
गणेश भोसले यांच्या ओघवत्या वाणीने सर्व विद्यार्थी व शिक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम वराट यांनी तर आभार अर्जुन रासकर यांनी मानले.




