जामखेड न्युज——
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मातोश्री पतसंस्थेचे चेअरमन बळीराम त्रिंबक मेहेर सर यांना कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन व मनोज दंडगव्हाळ कृषीउद्योग रणनीतीकार यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल आयकॉन बिझनेस आवार्ड नॅशनल एक्सलन्स आवार्ड २०२२साठी मेहेर यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मेहेर यांना १९ आॅगस्ट रोजी नाशिक येथे नॅशनल बिझनेस आयकॉन पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर होते तर अध्यक्ष नाशिकचे उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल पुनम बिरारी, उपव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ चंद्रशेखर बारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे, चेअरमन अॅग्रो केअर गृप आॅफ कंपनी भुषण निकम तर निमंत्रक म्हणून नाशिकचे कृषी उद्योग रणनीतीकार मनोज दंडगव्हाळ, एजीसी इव्हेंट नाशिकच्या संचालक रोहिणी पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


बळीराम मेहेर सर यांना नॅशनल बिझनेस आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे, सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर, तसेच अनेक पतसंस्थाचे चेअरमन व संचालक मंडळ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे चेअरमन व संचालक यांच्या सह मित्रमंडळी नातेवाईक व खातेदारांनी मेहेर यांचे अभिनंदन केले आहे.

बळीराम त्रिंबक मेहेर हे मातोश्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी २०१७ मध्ये मातोश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला यामुळे छोट्या व्यावसायिकांना फायदा झाला महिलांना बचतीची सवय लागली बचत गटांना कर्जपुरवठा केल्याने अनेकांना स्वतः चे लहान लहान उद्योग सुरू करता आले.
२०२० मध्ये सुरू केलेल्या नान्नज उद्योग समूह संचलित मेहेर ट्रेडर्स मुळे परिसरातील लोकांना बांधकामासाठी लागणारे साहित्य नान्नज मध्ये उपलब्ध झाले यामुळे लोकांची वेळ व पैशाची बचत झाली.
२०२० मध्ये स्थापन केलेल्या नान्नज अर्बन निधी लिमिटेड मुळे ठेवीदारांना फायदा झाला परतावा मिळाला छोट्या व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध झाले व्यावसायिक व शेतकरी यांची आर्थिक प्रगती झाली.
२०२१ मध्ये स्थापन केलेल्या नान्नज दुध संकलन केंद्रामुळे शेतकरी वर्गाचा खुपच फायदा झाला योग्य भाव मिळाला दैनंदिन गरजा भागू लागल्या. शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला
२०२१ मध्ये स्थापन केलेल्या ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालयामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे मासिके वाचायला मिळाली स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना फायदा झाला.
मातोश्री दाडमिल मुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला कच्च्या मालापासून पक्का माल जवळच उपलब्ध झाला.
बळीराम मेहेर सर यांना पुरस्कार मिळाल्याने जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.



