Wednesday, April 1, 2026
Home ताज्या बातम्या स्पर्धा परीक्षेसाठी वशिला लागतो हा गैरसमज -पो.नि.संभाजीराव गायकवाड ...

स्पर्धा परीक्षेसाठी वशिला लागतो हा गैरसमज -पो.नि.संभाजीराव गायकवाड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जिल्ह्यात मॉडेल ठरेल -शशिकांत देशमुख

0
326

जामखेड न्युज——

   स्पर्धा परीक्षेसाठी वशिला लागतो हा गैरसमज स्पर्धा परीक्षेत अपयश मिळालेले विद्यार्थी पसरवितात एकदा आपण मनाने ठरवले व प्रयत्न सुरू केला तर यश कोणीही तुमच्या पासून थांबवू शकत नाही.अभ्यासात प्रमाणिकपणा ठेवा तुम्हाला पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही  तुम्ही  जामखेड मध्ये जिद्द, चिकाटी व मेहनतीने 
यशस्वी होऊ शकता. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले

ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, संस्थेचे सचिव, शशिकांत देशमुख, संचालक सैफुल्ला खान, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसुळ, प्रा. बाळासाहेब कोल्हे, प्रा. समुद्र पोलीस हेडकाॅन्टेबल अविनाश ढेरे,  सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, जे जिद्दीने पेटून अभ्यास करतात तेच यशस्वी होतात. अभ्यास करणाऱ्या मुलांना परिस्थिती आडवी येत नाही. स्वत:  स्वत:ची स्पर्धा करा, वातावरण निर्माण करा  कोणताही क्लास न लावता मी जिद्द व चिकाटीने पहिल्या प्रयत्नात फौजदार झालो. ते जिद्द व चिकाटी मुळेच, मोबाईलचा वापर करा पण आॅनलाईन क्लासेससाठी स्वत: स्वत :चा प्रकाश बना प्रत्येक पाषाणापासून मुर्ती बनू शकते फक्त टाकीचे घाव सोसावे लागतात. त्यामुळे जिद्द चिकाटी व मेहनत ठेवा यश हमखास मिळणारच. 
   यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी म्हणाले की,आजपर्यंत या संस्थेतून अनेक नामवंत व्यक्ती घडल्या आहेत आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामुळेतर स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.  
   यावेळी बोलताना दिली. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की,  स्पर्धा परीक्षेसाठी
एकच ध्यास हवा ध्येयावर लक्ष केंद्रित करा प्रयत्न करा वेळ द्या  सातत्य ठेवा, जिद्दीने ध्येयावर लक्ष केंद्रित करा यश मिळणारच या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच सीईटी, नीट, जेईई स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे जिल्ह्यात माॅडेल ठरेल असे काम करावे. असे आवाहन केले. 
  संचालक सैफुल्ला खान म्हणाले की, बारावी नंतर काय यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्रचा फायदा होणार आहे. त्यांनी पोलीस भरतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
  प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले की, युपी बिहार चे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी जास्त यशस्वी का होतात तर ते प्रचंड मेहनत घेतात. आर्ट, सायन्स व काॅमर्स सर्व शाखा सारख्याच महत्त्वाच्या आहेत कोणतीही शाखा कमी महत्त्वाची नाही. भावी आयुष्याच्या फायद्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रचा फायदा होणारच आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. 
प्रस्तावित करताना उपप्राचार्य पोपट जरे म्हणाले की,  कला व वाणिज्य शाखेकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे पण तसे काही नाही. स्पर्धा परीक्षेत आपण नावलौकिक मिळवू शकतो. दर शनिवारी मार्गदर्शन करण्यात येणार, 
 कार्यक्रमाची रूपरेषा प्रा. विश्वनाथ आघाव यांनी सांगितली
स्पर्धा परिक्षेला सामोरे जाण्याची संधी मार्गदर्शन केंद्राद्वारे संस्थेचे उपलब्ध करून दिली आहे. या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. 
     सिद्धू पवार यांनी सांगितले की, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या  केंद्राचा फायदा होईल. 
 प्रल्हाद साळुंखे यांनी फिजिकल विषयी मार्गदर्शन केले. 
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  वंदना डुचे व प्रमिला पोकळे यांनी तर आभार प्रा. संभाजी शेटे यांनी मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!