Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या तरूणाच्या मृत्यू प्रकरणी आमदार रोहित पवारांनी विधानसभेत उठवला आवाज   पारधी...

जामखेडच्या तरूणाच्या मृत्यू प्रकरणी आमदार रोहित पवारांनी विधानसभेत उठवला आवाज   पारधी समाज बांधवांच्या वतीने जामखेड तहसील व पोलीस स्टेशनला निवेदन

0
289

 

जामखेड प्रतिनिधी
              जामखेड न्युज——

जामखेड येथिल नागेश रामदास पवार हा तरुण मोलमजुरी करण्यासाठी दोन महिन्यांपुर्वी पुणे या ठिकाणी गेला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या वेळी त्याला रेल्वे पोलिसांनी मारहाण केली व या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मुत्यु झाला आसा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या जामखेडमधील नागेश रामदास पवार या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’खाली या गंभीर घटनेकडं सरकारचं लक्ष वेधून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आणि मयत तरुणाच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी आमदार रोहित दादा पवार यांनी केली आहे.

आज जामखेडमध्ये तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस स्टेशनला पोलीस हेडकाॅन्टेबल संजय लोखंडे यांना निवेदन देण्यात आले सदर प्रकरणी सखोल चौकशी करून पुणे रेल्वे पोलीस यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, पारधी आदिवासी महासंघाचे प्रकाश काळे, राम पवार, विशाल पवार, शिवहारी काळे, दादा पवार, संतोष पिंपळे, रामकिसन पवार, साधना शिंदे, लक्ष्मी पवार, अलका पिपळे, हर्षद काळे ,आरफात बागवान, करण चव्हाण ,अनिल समुद्र, आकाश काळे, रोहित काळे, यूवराज शिंदे ,साहील बागवान यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.

या बाबत अधिक माहिती आशी की जामखेड शहरातील आरोळे नगर भागातील तरुण नागेश रामदास पवार रा. जामखेड. जिल्हा. अहमदनगर हा दोन महीन्यापुर्वी फुलविक्री मोलमजुरी करण्यासाठी पुणे या ठिकाणी गेला होता. याच दरम्यान दि १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्याला पुणे येथील रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. यावेळी तपासा दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन पोलिसांनी त्यास मारहाण केली त्यामुळे या अमानुष मारहाणीत नागेश पवार याचा काल २३ अॅगस्ट २०२२ रोजी रात्री मुत्यू झाला आहे आसा आरोप नागेश पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

आज विधानसभेत आमदार रोहित पवारांनी
चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या जामखेडमधील नागेश रामदास पवार या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’खाली या गंभीर घटनेकडं सरकारचं लक्ष वेधून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आणि मयत तरुणाच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी आमदार रोहित दादा पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!