जामखेड न्युज——
जामखेड येथिल नागेश रामदास पवार हा तरुण फुलविक्री मोलमजुरी करण्यासाठी दोन महिन्यांपुर्वी पुणे या ठिकाणी गेला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या वेळी त्याला रेल्वे पोलिसांनी मारहाण केली व या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मुत्यु झाला आसा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी आज माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी सुरु आसलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनात आवाज उठवला आहे.तसेच मयताच्या नातेवाईकांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

आज जामखेडमध्ये तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस स्टेशनला पोलीस हेडकाॅन्टेबल संजय लोखंडे यांना निवेदन देण्यात आले सदर प्रकरणी सखोल चौकशी करून पुणे रेल्वे पोलीस यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, पारधी आदिवासी महासंघाचे प्रकाश काळे, राम पवार, विशाल पवार, शिवहारी काळे, दादा पवार, संतोष पिंपळे, रामकिसन पवार, साधना शिंदे, लक्ष्मी पवार, अलका पिपळे, हर्षद काळे ,आरफात बागवान, करण चव्हाण ,अनिल समुद्र, आकाश काळे, रोहित काळे, यूवराज शिंदे ,साहील बागवान यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.


या बाबत अधिक माहिती आशी की जामखेड शहरातील आरोळे नगर भागातील तरुण नागेश रामदास पवार रा. जामखेड. जिल्हा. अहमदनगर हा दोन महीन्यापुर्वी मोलमजुरी करण्यासाठी पुणे या ठिकाणी गेला होता. याच दरम्यान दि १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्याला पुणे येथील रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. यावेळी तपासा दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन पोलिसांनी त्यास मारहाण केली त्यामुळे या अमानुष मारहाणीत नागेश पवार याचा काल २३ अॅगस्ट २०२२ रोजी रात्री मुत्यू झाला आहे आसा आरोप नागेश पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या बाबत ची माहिती मयत नागेश याच्या नातेवाईकांनी जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते व भाजपा अ. नु. जा. ज चे तालुका अध्यक्ष संतोष गव्हाळे यांना दिली.

यानंतर त्यांनी ही घटना आज सकाळी भाजप चे कर्जत जामखेड चे माजी मंत्री. आ. प्रा राम शिंदे यांना दुरध्वनी वरुन कळवली. या वेळी आ. प्रा राम शिंदे हे पावसाळी अधिवेशना निमित्त ते मंबई या ठिकाणी आहेत. या बाबत आ. प्रा राम शिंदे यांनी या घटनेची दखल घेत याबाबत आज सुरू आसलेल्या पाचव्या दिवशी च्या पावसाळी अधिवेशनातील विधान भवनात आवाज उठवत प्रश्न उपस्थित केला व सरकारने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आशी मागणी केली. नागेश याच्या मुत्यूची माहिती समजताच त्याचे नातेवाईक आज सकाळी जामखेडहुन पुणे या ठिकाणी रवाना झाले आहेत.