उभ्या ट्रकवर ट्रक आदळला; चालकाचा जागीच मृत्यू

0
248
जामखेड न्युज——
पंक्चर झालेल्या ट्रकचे टायर खोलत असताना
भरधाव आलेल्या दुसऱ्या ट्रकने ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात पंक्चर असलेल्या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरील इमामपूर उड्डाणपूलावर घडला.
अमजद नजीर शेख (वय 36 रा. मरियाल गुडा जि. नलगोंडा, तेलंगणा) असे मयत चालकाचे नाव आहे. तर त्यांचा सहकारी अझहर जहिरोद्दिन मोहम्मद (वय 24) असे जखमीचे नाव आहे. ते कांदा भरलेला ट्रक (एपी 29, टीबी- 1479) घेऊन जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरील इमामपूर जवळील उड्डाणपुलावर ट्रक पंक्चर झाल्याने रस्त्यावरच उभा केलेला होता. 
चालक व सहकारी दोघे पंक्चर काढत
असताना पाठीमागून फरशी घेऊन भरधाव आलेला ट्रक (जिजे 25 यू- 5545) यांच्या ट्रकवर आदळला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 
जखमीस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस हवालदार पी.टी.चव्हाण, आनंद मस्के, खय्युम खान, पोलीस नाईक राऊत,शिपाई रवी सानप, होमगार्ड शिंदे व सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here