जामखेड जवळ झालेल्या अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू

0
280
जामखेड न्युज——
जामखेड खर्डा रोडवरील मारुती मंदीरा जवळ एका मोटार सायकल स्वरास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या झालेल्या भिषण अपघातातील परमेश्वर प्रभाकर पिंपरे रा. बसरवाडी शिऊर येथील व्यक्तीस वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केलेल्या अथक प्रयत्ना नंतर ही अपघातग्रस्त पिंपरे हे मृत झाल्याने कोठारी यांनी मोठी खंत व्यक्त केली. 
     याबाबत सविस्तर असे की, जामखेड पासून ३ कि.मी. अंतरावर खर्डा रोडवरील मारुती मंदिराजवळून परमेश्वर प्रभाकर पिंपरे रा.  बसरवाडी (शिऊर)ता. जामखेड हे शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी मोटारसायकलवरून जामखेडकडे येत असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने सकाळी ६ : ०० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने पिंपरे हे गंभीर जखमी झाले.
याबाबतची माहीती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना पत्रकार अजय अवसरे यांच्या कडुन मिळाल्यानंतर कोठारी यांनी क्षणाचा ही विलंब न करता नेहमी प्रमाणे आपली स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले. प्रत्यक्ष परिस्थीती पहाता घटना स्थळावरील अपघातातील पिंपरे हे  रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यामुळे वेळ न दवडता कोठारी यांनी परमेश्वर पिंपरे ताबडतोब काही लोकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत टाकुन जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पोहच केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी ताबडतोब अपघातग्रस्त पिंपरे यांची  तपासणी केली मात्र पिंपरे यांचा कसलाच प्रतिसाद जाणवत नसल्याने ते मृत असल्याचे त्यांनी घोषित केले. 
     याबाबत कोठारी यांनीच सदर घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना तसेच मृताच्या नातेवाईकांना दिली. याबरोबरच डॉ. युवराज खराडे यांनाही कोठारी यांनीच माहिती दिली. या संपूर्ण धावपळीच्या कामात अजय अवसरे, गणेश शेंडगे, प्रदीप घोडके, रमेश अनभुले, हुसेन बागवान, राहुल शेलार आदींनी कोठारी यांना मोलाचे सहकार्य केले. कोठारी यांची प्रामाणिक इच्छा असताना अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचला नाही याची कोठारी यांनी खंत व्यक्त केली. 
    ते नेहमी समाजा प्रती सेवेसाठी सज्ज असतात त्यांनी तालुकाच नव्हे तर शेजारी पाटोदा तालुक्यातील सैताडा घाट, आष्टी तालुक्यातील खडकत इथपर्यत जात हजारों अपघातग्रस्तांना मदत करत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. अपघातातील मृतदेह स्वतः उचलणे, नातेवाईकांच्या ताब्यात देणे, डॉक्टर जवळ बसून काळजी घेणे, बेवारस मृतांचे अंत्यसंस्कार करणे तसेच अपघातातील लोकांच्या नातेवाईकांना पोस्टमार्टम रिपोर्ट पोलीस पंचनामा नक्कल आणि मृत झालेल्या मृत्यू दाखला अशी कागदपत्रे घरपोच करतात अशी अनेक जबाबदारीचे कामे अंतकरणातुन केली आहेत अशा थोर समाज सेवी व्यक्तीच्या प्रती सर्व स्थरातुन नेहमी कौतुकाचे सुर निघतात हे मात्र खरे. 
  मृत परमेश्वर पिंपरे हे शेतकरी होते. पण शेती व्यवसाया बरोबरच बांधकाम कामगार म्हणूनही काम करत होते. आपला शेतमाल लिवावात देऊन ते बांधकाम मजूरीसाठी जाणार होते. मात्र काळाने मध्येच त्यांचेवर घाला घातला. मृत परमेश्वर पिंपरे यांच्या मागे आई वडील, पत्नी व तिन अविवाहित ३ मुलं असा परिवार आहे.
    सदर अपघाताची खबर शिऊर येथील उपसरपंच सिद्धेश्वर लटके यांनी दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर भागवत हे  करत आहेत.
चौकट…. 
जामखेड येथील  भाजीपाला व इतर तरकारी मालाचे लिलाव हे भल्या पहाटे होत असतात. त्यामुळे शेतकरी पहाटे तीन ते चार वाजे दरम्यान आपला माल जामखेडकडे घेऊन येण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे अपघात होतात. अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी लिलाव उशिरा करावेत. 
शेतकरी अनिल अडाले,  सावरगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here