जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
अपघाताने किंवा आजारपणामुळे पतीची साथ सुटल्याने खचून न जाता संघर्षाचा विडा उचलत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत संघर्ष करणाऱ्या विधवा रणरागिणींचा सन्मान कार्यक्रम महिला दिन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने जागर स्त्रीशक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद मित्रमंडळाच्या वतीने रोहिणी संजय काशीद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅड स्नेहल फुटाणे, डॉ. विद्या काशीद, आरती राळेभात, डॉ. मनिषा पवार, मिरा तंटक शिवसेना महिला संघटक, गौरी कुचेकर शिवसेना महिला प्रमुख या होत्या.

महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिप्रीत्यर्थ पती निधनानंतर कुंटुबाचा समर्थपणे सांभाळ करणार्या सुमारे शंभर पेक्षा जास्त यशस्वी माताभगिणींचा सन्मान यावेळी करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सौ. रोहिणीताई संजय काशिद जागर स्त्री शक्तीचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला.
ग्रामीण भागात व शहरातही आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होतात शेतकरी कुटुंबात हे जास्त पहायला मिळते कारण शेतकरी कर्जामुळे शेतातील पिक खराब आल्यामुळे शेत पिकाला भाव न मिळाल्याने आत्महत्या करतात आणि आपल्या कुटुंबाला सोडून जातात परंतु त्यानंतर शेतकऱ्यांची पत्नीचा सर्व कुटुंबाचा संभाळ करते व आज आपण जागर स्त्री शक्तीचा या समारंभात या यशस्वी माताभिगिनीचा सन्मान करण्यात आला.
रोहिणी काशीद यांनी या कर्तृत्ववान महिलांना शाल, साडी श्रीफळ, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी उषा राळेभात, उषा खरात, पद्मिनी गायकवाड,
रूक्मिणी जगदाळे, पद्मिनी बोराटे, सुमनबाई खेत्रे, पदमिनबाई फरांडे, सुनिता गायकवाड, सुमन जाधव, संजना पवार, अरूणा विटकर, शकुंतला सिद्धेश्वर यांच्या सह सुमारे शंभर पेक्षा जास्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळत सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रेया तंटक यांनी केले.