स्वच्छतेच्या जागर बरोबरच दोन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांचे आळे स्वच्छ करत टॅकरने पाणी घालून झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा – सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांचा स्तुत्य उपक्रम

0
229
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
दोन वर्षापुर्वी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांच्या आळ्यांची साफसफाई करून टॅकरने पाणी घालून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी गेल्या वीस दिवसांपासून समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन स्वच्छता लोकचळवळ बनवली आहे. यामुळे शहरात स्वच्छतेची नवी पहाट उगवली आहे व स्वच्छतेचा जागर सुरू झाला आहे. याच बरोबर हरित जामखेड साठी गेल्या दोन वर्षांपासून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून त्या झाडांना संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात आठ दिवसांतून एकदा टॅकरने पाणी घातले जात आहे. यामुळे येत्या काही दिवसांत आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड उदयाला येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा) आजबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वतः च्या वाढदिवसानिमित्तही मोठ्या प्रमाणावर झाडे लावून संरक्षक जाळी बसवली आहे तसेच नगरपरिषदेस पाचशे वड व पिंपळाची झाडे दिली आहेत. हरित जामखेड बरोबरच स्वच्छता अभियान हि लोकचळवळ बनवली आहे. शहरातील प्रभाग वीस व प्रभाग पाच मधील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले त्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून जामखेड शहरातील तरुण स्वच्छतेचा कामासाठी स्वयंप्रेरणेने सरसावले असून दररोज सकाळी श्रमदानासाठी पुढे येत आहेत. यामध्ये व्यापारी, कर्मचारी, युवक संघटना, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे दहा-बारा वर्षाच्या चिमुरड्यांनीही सहभागी होऊन स्वच्छतेचा जागर सुरू ठेवला आहे. यामुळे शहरातील विविध प्रभागातील कार्यकर्ते व नेते यांनीही आजबे यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वच्छतेचा जागर सुरू ठेवला आहे.
शहराच्या स्वच्छतेकरिता गेली वीस दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, दिपक घोडके, अशोक हिंगणे, माऊली खांडवे, गणेश खांडवे, ऋषी आजबे, अनिल आजबे, अशोक पोटफोडे, अंबादास चव्हाण, दादा ढवळे, गणेश साळुंके, पप्पू साळुंके, चंद्रकांत आजबे, धनंजय कसाब, अमोल डाडर, रणजित मुंडे, विष्णू काळदाते, गणेश कोल्हे, महादेव कोल्हे, पप्पू कोल्हे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती स्वच्छतेसाठी पुढे येत आहेत. व जामखेड शहराला पहिल्या पाच मधे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
     एक वर्षाच्या चिमुकली पासून ते दहा वर्षे वयोगटातील सुजन डाडर, आयन शेख, साजेब शेख, आदित्य बोराडे, साहिल आत्तार या चिमुरड्यांनीही श्रमदानाचे योगदान दिले. तसेच ऐंशी वर्षाचे नागरिकही स्वच्छतेच्या कामात स्वतः झोकून देऊन काम करत आहेत. श्रमदानासाठी ज्याठिकाणी नागरिक एकवटलेले असतात त्याठिकाणी जावून योगदान देतात. त्यांच्या या उपक्रमातील सहभागाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे जामखेड शहरात स्वच्छतेची नवी पहाट उगवली आहे.
       सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छ माझं घर, स्वच्छ माझं आंगण’ या स्पर्धेत
विठ्ठल वराट यांनी प्रथम क्रमांक मिळवून प्रेरणा घेतली आणि स्वतःला स्वच्छतेचा कामासाठी वाहून घेतले. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू त्यांनी तयार केले आहेत. त्यांनी फाटक्या टिशर्ट पासून बनविलेले झाडू चांगलेच चर्चेत आले आहेत.
    सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी या स्वच्छतेच्या कामात स्वतः ला झोकुन देत परिसरातील नागरिकांना एकत्र करून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला आहे. रमेश आजबे यांनी आतापर्यंत पदरमोड करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. स्वतःच्या गावाबरोबर मामाचे गावही लोकसहभागातून आदर्श केले बिनविरोध निवडणूका, मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी मुरमीकरण, पेव्हिंग ब्लाॅक, बंदिस्त गटारे, लाईट ची कामे, आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले, ग्रामीण रूग्णालयात बोअरवेल घेतल्याने व मोटार बसविल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली. शहराच्या स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा शहर हिरवाईने नटावे याकरिता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे लावली झाडांना टॅंकरने पाणी घातले व संरक्षक जाळी बसवली त्यामुळे हरित जामखेड होऊ लागले आहे. आता तर प्रभाग वीस व प्रभाग पाच श्रमदानद्वारे चकाचक केला आहे. झाडांचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झाडांचे आळे साफसफाई करत टॅकरद्वारे पाणी घातले. या सर्व उपक्रमामुळे थोड्याच दिवसांत स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड उदयास येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here