महाशिवरात्रीचे महत्त्व – – घेतला वसा टाकू नको – नागेश घायाळ

0
213
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
नागेन्द्रहाराय त्रिलोचनायभस्माङ्गरागाय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम: शिवाय
महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. सर्वदेवांमधे भगवान शिवाचे महत्व अत्याधिक असुन हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केल्या जातो. या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात.
ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले.या विषात
ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून
ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय
सांगितला.सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण
घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते.अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यादिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.शिवाच्या मंदिरांमधे महाशिवरात्रीला मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसुन येते.बारा ज्योर्तिलिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने
भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तिर्थक्षेत्र आहेत तेथे मोठयामोठया यात्रा भरतान. शिवशंकराला 108 बेल
वाहुन शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहाण्याची देखील पध्दत आहे. विदर्भात आजच्या दिवशी
घोंगलाचे फुल शिवाला वाहाण्याची परंपरा आहे.शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नमः शिवाय’ हा जप जास्तीत जास्त करावा,
…..भगवान शिवाला भोळा शंकर’
देखील म्हंटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि इंच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली
जाते ती अशी… एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली. दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर
ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ‘की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे
आहे’ त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे ते पाहाता पारध्याच्या
मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.देवाधिदेव
महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला. सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला
व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला
तो दिवस महाशिवरात्रीचा होता….
ओम नमः शिवाय—–
पुरोहित
श्री नागेश घायाळ गुरुजी
मो.9552443156

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here